मालसई येथील रामचंद्र महादू तेलंगे यांचे आकस्मिक निधन सेवानिवृत्त कर्मचारी, कब्बडीपटू,व्यावसायिक व गावाशी नाळ जोडलेले व्यक्तीमत्व हरपल्याने सर्वत्र हळहळ

Share Now

280 Views

रोहा-(प्रतिनिधी) मालसई गावातील रामचंद्र महादू तेलंगे यांचे शुक्रवार दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी रोहा येथील राहत्या ह्दय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 74 वर्षे होते. कै. रामचंद्र महादू तेलंगे हे गावचे सल्लागार होते. गावच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचे मोलाचे सहकार्य लाभायचे. उत्कृष्ट कबड्डीपटू अशी त्यांची ओळख होती. स्वभावाने मनमिळावू असल्याने त्यांचा मोठा जनसंपर्क होता. पाटबंधारे विभागात त्यांनी कर्मचारी म्हणून त्यांनी अनेक वर्ष सेवा केली. ते पाटबंधारे विभागात कार्यरत असताना मालसई व त्या लगतच्या गावांना पाण्याच्या समस्या कधीही भेडसावल्या नाहीत. पाटबंधारे विभागातील सरकारी कर्मचारी म्हणून त्यांनी आपली कर्तव्य चोख पार पाडली.

सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शेतीत मन रमवले. कै.रामचंद्र तेलंगे यांना “अण्णा” म्हणून संपूर्ण गाव ओळखत असे. गावातील सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार होता. कै. रामचंद्र तेलंगे यांच्या पश्चात मुलगा, सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने तेलंगे कुटुंबीय, नातेवाईक व मालसई ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे पुढील कार्य दशक्रिया रविवार दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी राहत्या मालसई येथे घरी होणार आहे. तर उत्तर कार्य ३ जानेवारी 2023 रोजी मालसई येथील राहत्या घरी होणार आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. हिच “अण्णां”ना भावपूर्ण श्रध्दांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *