धुतूम गावकऱ्यांच्या विश्वास सार्थकी लावणार – नवनिर्वाचित सरपंच सुचिता ठाकूर

Share Now

36 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील धुतूम गावातील जनतेने माझ्या सारख्या सर्वसामान्य गूहिणीवर विश्वास टाकून गावाच्या विकासासाठी मला धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भरघोस मताधिक्याने निवडून दिले आहे. या गावकऱ्यांचा विश्वास सार्थकी लावणार असल्याचे अभिवचन नवनिर्वाचित सरपंच सुचिता ठाकूर यांनी दिले आहे. धूतूम गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वास नवनिर्वाचित सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर धुतूम नवनिर्वाचित सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर या बोलत होत्या.धुतूम गाव हे शंभर टक्के सिडको बाधित गाव आहे. त्यामुळे येथील सिडको बाधित प्रकल्पग्रस्त रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम हे सिडकोचे प्रथम आहे. त्यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याने निश्चित सिडकोकडे पाठपुरावा करणार आहे. असा विश्वास गावकऱ्यांना नवनिर्वाचित सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी दिला आहे.

धुतूम ग्रामपंचायतीच्या ग्राम विकास आघाडीच्या नवनिर्वाचित सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर व नवनिर्वाचित उपसरपंच कविता कुंदन पाटील तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सुचिता राजन कडू, स्मिता नंदुकुमार ठाकूर, अनिता सुजित ठाकूर, चंद्रकांत कमळाकर ठाकूर, रविनाथ बाळाराम ठाकूर, प्रेमनाथ अनंत ठाकूर, करिष्मा ठाकूर, प्रकाश ठाकूर यांनी 1984 सालच्या शेतकरी लढ्यातील हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जनसेवेसाठी आशिर्वाद घेतला. याप्रसंगी नवीमुंबई परिसरातील यशस्वी उद्योजक पी.जी.ठाकूर, नारायणशेठ ठाकूर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर, रायगड जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, काँग्रेस पक्षाचे गाव अध्यक्ष शंकर ठाकूर, कुष्णा ठाकूर, माजी सरपंच अमुत ठाकूर, माजी सरपंच रामनाथ ठाकूर, माजी सरपंच शंकर ठाकूर, भास्कर ठाकूर, कुंदन पाटील, वामन ठाकूर, लक्ष्मण ठाकूर आदी सह इतर मान्यवरांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.