अलिबाग तालुका महिला सेनेच्या मुख्य पदाधिकारी यांच्या येथे अलिबागगड येथे नियुक्त्या

Share Now

90 Views

अलिबाग (अमूलकुमार जैन) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अलिबाग तालुका महिला सेनेच्या मुख्य पदांच्या नियुक्त्याअलिबाग गड येथे पार पडल्या.

रायगड जिल्हाध्यक्षा सपनाताई राऊत-पाटील व उपजिल्हा अध्यक्ष्य शैलेश खोत यांच्या हस्ते अलिबाग तालुकाध्यक्षा पदी ऍड. मानसी संकेत ठाकूर, अलिबाग शहर अध्यक्षा पदी अनिता अजय गुंजाळ, आणि महिला सेनेच्या तालुका सचिवपदी पल्लवी बेलोसकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्या प्रसंगी तालुकाध्यक्ष सिद्धू म्हात्रे, तालुका सचिव विनायक पालेकर, उपतालुकाध्यक्ष अरुण ठाकूर व सारज भोईर, विभाग अध्यक्ष जितेंद्र भोईर, शाखाध्यक्ष श्री सागर म्हात्रे व यश घरत तसेच सचिन डाकी, श्री संकेत ठाकूर, रुतिक भोईर व इतर महाराष्ट्रसैनिक यांच्या उपस्थितीत पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published.