माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक व जुनिअर कॉलेज नवीन शेवा येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.

Share Now

256 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) बुधवार दिनांक ०४ जानेवारी २०२३ रोजी उरण तालुक्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक व जुनिअर कॉलेज नवीन शेवा येथे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध नृत्याविष्कार अतिशय चांगल्या प्रकारे सादर केले. वर्षभरात शैक्षणिक तसेच क्रिडा स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. तसेच २००५ साली आम्ही स्थापन केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालयाचे नंतर जु कॉलेज मध्ये रूपांतर झाले. आज या विद्यालयाची विद्यार्थी या गावाची सरपंच झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो. असे मनोगत व्यक्त केले. या वेळी नवनिर्वाचित सरपंच सोनल घरत यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमात आताच झालेल्या नवीन शेवा ग्रामपंचायत निवडणूकित विजयी झालेल्या सरपंच सोनल घरत, उपसरपंच कुंदन भोईर, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र पाटील, मयुरी घरत, रेखा म्हात्रे, सतीश सुतार, भावना भोईर, अशोक दर्णे, प्रणिता भोईर व वैशाली म्हात्रे यांचा सत्कार संस्थेच्या वतीने अध्यक्ष माजी आमदार तथा शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष व उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, उद्योगपती दयाळशेठ भोईर, उपतालुका संघटक के एम घरत, संस्थेचे सचिव व द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, संस्थेचे खजिनदार व न्हावा शेवा कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश घरत, कामगार नेते गणेश घरत, शाखाप्रमुख शैलेश भोईर, एल जी म्हात्रे, पंकज सुतार, भारत भोईर,माजी प. स. सदस्य सरिता पाटील, माजी सरपंच लीलावती भोईर, महिला आघाडी शाखाप्रमुख वैशाली सुतार, वासंती म्हात्रे, सुरेखा भोईर, शुभांगी भोईर, जागृती घरत, मनीषा घरत, संस्थेचे सदस्य भुपेंद्र भोईर, परशुराम ठाकूर, पंढरीनाथ भोईर, महेंद्र भोईर, मोरेश्वर भोईर, केशव घरत, तुकाराम भोईर व कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक संतोष म्हात्रे, शिक्षक वर्ग व पदाधिकारी यांनी केले होत तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशांत म्हात्रे यांनी केले. एकंदरीत स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *