चोंढी येथे साईबाबा पालखीचे भव्यदिव्य स्वागत

Share Now

164 Views

अलिबाग (अमूलकुमार जैन) श्री साईधाम पालखी यात्रा सेवा संस्थेची रांजणपाडा ते शिर्डी साईबाबांच्या पालखी पायी वारीचे दोन वर्षे कोरोना कालखंड वगळता सालाबादप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते व किहीम ग्रामपंचायत सदस्य पिंट्या ऊर्फ प्रसाद गायकवाड यांनी चोंढी येथे भक्तिमय वातावरणात पालखीची भोई वाहत भव्य स्वागत केले. तसेच रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकुर यांनीसुद्धा पालखीची भोई वाहत आपल्या चोंढी येथील कार्यालयाजवळ भव्यदिव्य असे पालखीचे स्वागत केले.

यावेळी सर्व साईभक्तांना राजाभाऊ ठाकुर यांच्यातर्फे चहापाणी व अल्पोपहार देण्यात आला, यानिमित्ताने साईधाम कमिटी रांजणपाडा यांनी राजाभाऊ ठाकुर, पिंट्या गायकवाड, पप्या दळवी, सुदेश समेळ, संदेश पाटील यांचा सन्मान व सत्कार केला. याकार्यक्रमाला पिंट्या गायकवाड व राजाभाऊ ठाकुर यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि मित्रपरिवारातील कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून साईबाबांच्या पालखीचे दर्शन घेतले व साईभक्तांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत पालखीचे प्रस्थान केले.

Leave a Reply

Your email address will not be published.