अलिबाग (अमूलकुमार जैन) सामाजिक कार्यात नेहमीच मदतीचा हात देण्यात अग्रेसर असणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष तसेच मापगांव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री सुनिल थळे यांनी श्री साईधाम पालखी पदयात्रा सेवा संस्थेची साईबाबांची पालखी रांजणपाडा ते शिर्डी पायी वारीचे सालाबादप्रमाणे शुक्रवार दि.०६जानेवारी रोजी आपल्या टाकादेवी येथील निवासस्थानी कुटुंबियांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करत दर्शन घेतले.
दोन वर्षे कोरोना काळखंडामुळे पायी दिंडीयात्रा निघाली नव्हती, यावर्षी कोरोना नियम शिथील झाल्यामुळे पुरुष व महिला साईभक्त मोठ्या संख्येने व मोठ्या उत्साहाने पायीदिंडी यात्रेत सहभागी झाले होते, यावेळी थळे यांच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांनी साईभक्तांचे आपुलकीने स्वागत करत सर्व साईभक्तांना चहापाणी व अल्पोपहार देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याकार्यक्रमाला सुनिल थळे यांच्या कुटुंबियांसोबत सरपंच उनिता थळे, श्री सेवाशक्ती ग्रामीण पतसंस्थेचे चोरोंडे अध्यक्ष सीताराम कवळे,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घरत, युवा नेता सूचित थळे, मापगांव महिला बचत गट अध्यक्ष शलाका थळे, ज्येष्ठ मार्गदर्शक केशव चांदोरकर सर, बहिरोळे पोलीस पाटील प्रफुल्ल थळे, संदीप थळे तसेच इतर पुरुष व महिला कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत साईबाबांच्या पालखीचे दर्शन घेतले होते.