केंद्रीय मंत्री कपिल पाटील व गोरख ठाकूर ह्यांच्या प्रयत्नातून किडनी पेशंट ला २ लाखाची ऑपरेशन साठी मदत

Share Now

202 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या कपिल पाटील फॉउंडेशन व उरण तालुक्यातील खोपटे गावातील सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर यांच्या प्रयत्नाने पनवेल तालुक्यातील केळवणे गावातील अविनाश मोकल यांना किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशनसाठी 2 लाखाची मदत मुख्यमंत्री सहायता निधी मधून झाली आहे व ही बॉम्बे हॉस्पिटल च्या अकाउंट वर जमा सुध्दा झाली आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केलेल्या विनंती पत्राच्या आधारे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या शिफारशीने हा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच संम्बधित पेशंटचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. तसेच ह्यापुढे उरण पनवेल तालुक्यात कुणालाही अशी वैद्यकीय मदतीची गरज असेल तर गोरख ठाकूर(फोन नंबर- 97025 35169)यांच्याशी संपर्क साधावे. असे आवाहन करण्यात आले आहे. गोरगरीब जनतेला, रुग्णांना आजाराच्या उपचारांसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवून देण्यास मदत केले जाईल. असे सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर यांनी सांगितले. गोरख ठाकूर हे गोरगरिबांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नशील आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक लोकांना सामाजिक बांधिलकीतून कोणाकडूनही एक रुपयाही न घेता निरपेक्ष भावनेने वैद्यकीय निधी, मदत मिळवून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *