रोहा येथील ज्वलर्स दुकानाच्या व इतर रायगड जिल्ह्यातील दुकानातील घडलेल्या चोरीच्या घटनेतील चोरास मुद्देमाला सह पोलिसांनी केली अटक, सर्वत्र कौतुक

Share Now

584 Views

रोहा (वार्ताहर) रोहा पोलीस ठाणे हद्दीतील ज्वेलर्स दुकानातील घरफोडी बाबत गुरनं 224/2022, भादवी कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा समांतर तपास LCB कडून युद्धपातळीवर सुरु होता तर यावर पोलीस यंत्रणेकडून केलेले तपासात मिळालेल्या गुन्हेगारी चोरास रोहा पोलिसांनी अटक केली आहे त्यामुले रोहा पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

LCB च्या तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक विकास चव्हाण, धनाजी साठे व पथकातील अंमलदार यांनी रोहा, पाली, नेरुळ, कर्जत, बदलापूर, अंबरनाथ येथील CCTV फूटेज तपासून तसेच पो उ नि चव्हाण व पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण यांनी केलेल्या मोबाईल टॉवर डंपडेटा विश्लेषणावरून एकूण 04 संशयित आरोपी निश्चित करून एका आरोपीस तीर्थपुरी, जालना येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

*अटक आरोपीतांचे नाव व पत्ता*

अनिलसिंग अर्जुनसिंग जुन्नी , वय 23 वर्षे, राहणार- शिकलगार मोहल्ला, तीर्थपुरी, ता. घनसावंगी, जि. जालना .

*पाहिजे आरोपीत*

1) पंकजसिंग काळुसिंग दुधानी रा. अंबरनाथ.
2) सोनुसिंग कपुरसिंग टाक रा.हडपसर, पुणे.
3) दिपकसिंग दिलीपसिंग टाक रा. तीर्थपुरी, जालना.

*अटक आरोपी कडून उघडकीस आलेले गुन्हे* :-

1) रोहा पोलीस ठाणे गुरनं 224/2022, IPC 454, 457,380

2) पाली पोलीस ठाणे गुरनं.170/2022 IPC 454,457, 380

3) माणगाव पोलीस ठाणे गुरनं 359/22, IPC 454, 457, 380

4) महाड पोलीस ठाणे गु.र.नं. 173/22, IPC 379

*सदर आरोपी कडून इतर जिल्ह्यातील उघडकीस आलेले गुन्हे* :-

1) मानवत पोलीस ठाणे, परभणी गु.र.नं.
354/2022, IPC 379

2) शेवगाव पोलीस ठाणे, परभणी गु.र.नं.
903/2022, IPC 379

*गुन्ह्यामध्ये हस्तगत करण्यात आलेली मालमत्ता*

1) रोहा पो स्टे येथील एकूण 550 ग्रॅम चांदी, कीं अं – 30000/- रु.
व 3800/- रु रोख रक्कम.

2) पाली पो स्टे येथील गुन्ह्यातील 2 किलो 257 ग्रॅम चांदी, कीं अं – 157000/- रु

3) माणगाव पो स्टे येथील गुन्ह्यातील 20000 रुपये रोख रक्कम

4) महाड येथील गुन्ह्यातील 4000 रुपये रोख रक्कम तसेच 4 चाकी कार ची नंबर प्लेट.

5) मानवत पो स्टे, परभणी येथील गुन्ह्यातील टाटा इंडिगो कार, एकूण किंमत 150000/- रु.

*एकूण 3,64,800/- रु किंचा मुद्देमाल*.

*अटक आरोपीचा पुर्व इतिहास*

अनिलसिंग अर्जुनसिंग जुन्नी , वय 23 वर्षे, राहणार- शिकलगार मोहल्ला, तीर्थपुरी, ता. घनसावंगी, जि. जालना याच्यावर औरंगाबाद आणि परभणी परिसरात घरफोडीचे 9 गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी LCB मधील पोलिस उप निरक्षक विकास चव्हाण, धनाजी साठे, पोलिस हवलदार/चव्हाण, कराडे, खैरनार, पो.ना. / जाधव, आवळे, मोरे, ओमले, सायबर सेल चे पोलिस शिपाई / अक्षय पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *