रोह्यात १४ जाने.रोजी रोहा प्रेस क्लब वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Share Now

240 Views

रोहा (केशव म्हस्के) मातृसंस्था मराठी पत्रकार परिषद, रायगड प्रेस क्लब संलग्न रोहा तालुक्यातील सक्रिय पत्रकारांची समाज सेवी संस्था रोहा प्रेस क्लब च्या माध्यमातून रोह्याचे सुपुत्र.डॉ.सी.डी. तथा चिंतामणराव देशमुख यांच्या १२७ वी जयंती निमित्ताचे औचित्य साधुन शनिवार दि.१४ जाने.२०२३ रोजी सायं.५:३० ते ७:३० वाजता रोह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी राम मारुती चौक येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर,मा.उपाध्यक्ष तथा सल्लागार राजेंद्र जाधव, रोहा प्रेस क्लब अध्यक्ष शशिकांत मोरे,स्पर्धा समिती प्रमुख पराग फुकणे,रोशन चाफेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रोहयाचे सुपुत्र स्वर्गीय.डॉ.सी.डी.तथा चिंतामणराव देशमुख यांच्या १२७ वी जयंती निमित्ताचे औचित्य साधून तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धे अंतर्गत लहान गट इयत्ता आठवी ते बारावी करिता १) कोरोना काळात आपण काय शिकलो,२)प्लास्टिक बंदी एक फसलेले अभियान ३) डॉ.सी.डी.देशमुख आणि देशभक्ती – नव्याने मांडणी.४) व्यसन सोशल मीडियाचे – कितपत फायदेशीर/ घातक. तर खुला गट प्रथम वर्ष महाविद्यालयीन ते पुढे १) तरुणांत क्रिकेट, कब्बडी अती वेड! करिअर कुठवर.२) देशातील भांडवलदारी चे वाढते प्रस्थ,लोकशाहीला मारक की तारक. ३)सोयीनुसार इतिहासाची मांडणी ,कितपत योग्य.४) लग्नासाठी मुलींची वानवा,नेमके चुकते काय ? हे विषय आहेत.
  
सदरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये तालुक्यातील विद्यार्थी, युवा – तरुण वर्गास विविध सामाजिक विषयांवर विचार मांडता यावेत, आपले मत प्रदर्शन करता यावेत यासाठी सहभागी होण्यासाठी सरचिटणीस,रोहा प्रेस क्लब नंदकुमार मरवडे सर – 8308688229, सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान चे संस्थापक रोशन चाफेकर – 8888056093, निमंत्रक हाजी कोठारी – 8179062017.केशव म्हस्के – 9273308248 यांच्याकडे नाव नोंदणी करिता संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *