खांब कुणबी समाजाची सभा मोठया उत्साहात संपन्न, गावोगावी बैठका घेऊन अधिक समाज गठित करणार रामचंद्र चितळकर यांचे प्रतिपादन

Share Now

215 Views

रोहा (श्याम लोखंडे) कुणबी समाजोन्नती संघ मुबंई संलग्न ग्रामीण शाखा रोहा विभागीय ग्रुप खांबची सभा मंगळवारी 10 जानेवारी रोजी ठीक ठराविक वेळेनुसार खांब येथील माता खामजाई मंदिर सभागृहात विभागीय अध्यक्ष रामचंद्रजी चितळकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली यावेळी विभागातील गावागावात गाव बैठका घेऊन समाज गठित करून समाजातील तरुण युवा पिढीत अधिक जनजागृती निर्माण करून समाज संघटना वाढीवर बळ देण्यासाठी सर्व समाज बांधव एकत्रितपणे काम करू असे प्रतिपादन चितळकर यांनी केले.

१३ जानेवारी रोजी रोहा तालुक्यात कुणबी जोडो अभिमान या कार्यक्रमाबाबत विशेषतः या सभेचे आयोजन खांब येथे करण्यात आले होते व सदरच्या कुणबी जोडो अभियानात विभागातील अधिक अधिक कुणबी बांधव व युवक तसेच महिला वर्गानी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी विभागीय अध्यक्ष व उपस्थित प्रमुख मान्यवरांनी केले आहे.

मुबंई संघाचे अध्यक्ष भूषण बरे व अशोक जी वालम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बकुणबी जोडो अभियान या पार्श्वभूमीवर व अभियानाच्या जय्यत तयारी व स्वागतासाठी आयोजित केलेल्या या सभेस यावेळी विभागीय अध्यक्ष रामचंद्र चितळकर, उपाध्यक्ष धनाजी लोखंडे,बाबुराब बामणे,रोहा तालुका उपाध्यक्ष मारुती खांडेकर सर, सचिव वसंतराव मरवडे, शंकर मरवडे, रामचंद्र मरवडे,सदानंद जाधव, नथू जाधव ,तुकाराम कोंडे, संदीप महाडिक, गजानन बामणे, नामदेव मरवडे, नथू शिंदे, खामकर, सखाराम कचरे, अनंत लोखंडे, दगडू लाडगे, सह खांब, नडवली, तळवली, चिल्हे,धानकान्हे,देवकान्हे, शिरवली,आदी विभागातील ग्रामस्थ कुणबी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

कोरोना काळानंतर प्रथमच आयोजित केलेल्या या सभेत समाजाची बांधिलकी आणि उन्नती त्याचबरोबर जनजागृती अधिक प्रत्येक गावागावात होतकरू तरुण पिढी यांच्यात रुतली पाहिजे याकरिता पुन्हा एकदा गावोगावी जाऊन समाज्याच्या हिताच्या प्रश्नांवर म्हणजेच जातीनिहाय जनगणना,जातनिहाय प्रमाणपत्र त्याच बरोबर शेतकरी वर्गाचा बेदखल कुळांचा प्रश्न भात खरेदी ला हमीभाव व त्यावरील बोनस यावर चर्चा सत्र सुरू करून पुन्हा समाज एक संघ गठित करण्याचा निर्धार आज खांमजाई सभागृहात येथील विभागीय कुणबी समाज बांधव यांनी एकमुखी केला आहे .
उत्स्फुर्त आणि उत्साही वातावरणात संपन्न झालेल्या या सभेत अध्यक्ष रामचंद्र चितळकर, रोहा तालुका उपाध्यक्ष मारुती खांडेकर सर,विभागीय सचिव वसंतराव मरवडे,उपाध्यक्ष धनाजी लोखंडे,बाबुराव बामणे,डॉ श्यामभाऊ लोखंडे यांनी समाजाबाबत मनोगत व्यक्त करत १३ जानेवारी रोजी तालुक्यात कुणबी जोडो अभियान रॅलीचे स्वागतासाठी जय्यत तयारी दर्शवली आहे. तर शेवटी आभार मानून या सभेची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *