देशात जातनिहाय जनगणना करण्यास सरकारच अपयश,जातनिहाय जनगणना झाली तर ओबीसी सत्तेत बसेल ; अशोक वालम

Share Now

226 Views

चिल्हे (श्याम लोखंडे) कोकणातच न्हव्हे तर देशातील राज्याराज्यात ओबीसी समाज सामाजिक शैक्षणिक आर्थिक व राजकीय दृष्टीने मागासलेला आहे त्यामुळे कोकणातील विखुरलेल्या कुणबी समाजाला एकत्रितपणे आणण्याचे काम कुणबी जोडो अभियानांतर्गत कोकणातील सात जिल्ह्यातून कुणबी समाजोन्नती संघाच्या माध्यमातून केले जात आहे.देशात जातनिहाय जनगणना करण्यास सरकार अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे जर देशात संपूर्ण जातीनिहाय जनगणना झाली तर सत्तेत ओबीसींचे संख्याबळ अधिक असेल आणि ती सत्तेत बसेल त्याच बरोबर ती सक्षम बनले व अधिक बळकट होईल या भीतीने जनगणना केली जात नसल्याचे प्रतिपादन कुणबी चेंबर्स ऑफ कॉमर्स तसेच कुणबी राजकीय संघटन समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी रोहा येथे केले.

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी,तद्नंतर रायगडात कुणबी जोडो या रथ अभियानाला पोलादपूर,महाड, माणगाव, तळा, म्हसळा त्या पाठोपाठ आज 13 जानेवारी या अभियानाची सुरुवात रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी ते समाजनेते स्व.माजी आमदार पा रा सानप कुणबी भवन रोहा येथे बाईक रॅली स्वागताने करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर संघाचे अध्यक्ष भूषण बरे, हरिश्चंद्र पाटील, कार्यध्यक्ष कृष्णा कोबनाक, ज्ञानदेव पवार, सदानंद काष्ठे, अशोक करंजे, शंकरराव म्हसकर, सुरेश मगर, शिवराम शिंदे, रामचंद्र सपकाळ, मारुती खांडेकर, शिवराम महाबळे, शंकरराव भगत, रामचंद्र चितळकर, खेळू ढमाल, विष्णू लोखंडे, पांडुरंग सरफळे, प्रो.माधव आग्री, डॉ.सागर सानप, डॉ. मंगेश सानप, दत्ताराम झोलगे, पोटफोडे, अनंत थिटे, महेश बामुगडे, सतीश भगत, अरविंद मगर, मुकेश भोकटे, सुहास खरीवलेसह मान्यवरांसह रोहा तालुक्यातील कुणबी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होता.

संघाचे अध्यक्ष भूषण बरे, अशोक वालम यांच्या संकल्पनेतून भूतो ना भविष्य ठरत असलेले कुणबी जोडा अभियानाला रोहा तालुका कुणबी समाजाचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या कुणबी जोडा अभियानात पुढे बोलतांना वालम म्हणाले की आपला कुणबी समाज हा इतर राजकीय लोकनेत्यांच्या दावणीला बांधला गेला आहे त्यामुळे समाजाचा विकास आणि उन्नती होत नाही समाज नेते शामराव पेजे ,कातकर,पा रा सानप,यांच्या काळात कोकणातून बारा ते तेरा आमदार विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जात होते मात्र आजच्या घडीला कोकणात ऐंशी टक्केहुन अधिक कुणबी समाज असून देखील एकही आमदार नसल्याची खंत व्यक्त करत थेट पुन्हा जातनिहाय जनगणना झाली पाहिजे कारण देश हा तीन ते चार टक्के असलेला समाज चालवत आहे असे म्हणत समाज नेते माजी आमदार शामराव पेजे न्यास आर्थिक महामंडळाची निधी ही दीडशे कोटींहून अधिक आहे ती आपल्या समाज बांधवांना न विचारता व न जुमानता परस्पर उपसमिती नेमून वापरली जात आहे तिचा फायदा आपल्या कुणबी बांधवांना मिळत नाही त्यामुळे आपले असलेले हेवेदावे हे सारे बाजूला ठेऊन एक दिलाने एक संघाने समाजाचे काम करू या असे आवाहन कुणबी जोडो अभियानांतर्गत केले.
कुणबी जोडो अभियान हे कोकणातील सात जिल्ह्यात संपन्न होत असून कुणबी समाजाच्या विकासासाठी तसेच भावी पिढीच्या उत्कर्षासाठी तसेच उन्नतीसाठी आपण एकत्रितपणे आले पाहिजे आणि येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत हे सत्ताधारी मंडळीना दिसले पाहिजे की कुणबी समाज काय आहे रत्नागिरीत कुणबी जोडो अभियालानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला त्याची दखल आता हळूहळू राज्यसरकार घेत असून दस्तुरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री बैठक घेण्यास तयारी दर्शवित आहेत मात्र आम्हाला बैठक नको तर न्याय हवा यासाठी आपल्याला जातनिहाय जनगणना हवाय आपली मजल सरोच ,पंचायत समिती,जिल्ह्य परिषद अध्यक्ष इथपर्यंत आहे मात्र आमदार खासदार नाही तर कुणबी समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपला कुणबी बांधव हा विधिमंडळात पोहचला पाहिजे यासाठी तुम्ही त्याला एकीचे बळ दिले पाहिजे याकरीता कुणबी जोडो अभियान आहे हा कुणबी समाजाचा विजयचा रथ आहे ही समाजासाठी पेटवलेली मशाल आहे आणि आपल्या घरा घरात समाजाची जनजागृती करत पेटली पाहिजे असे शेवटी सांगितले.

रोहा तालुक्यात कुणबी जोडो अभियानाला कुणबी समाज एकटवल्याचे सर्वत्र रॅलीत पहावयास मिळाले तर कार्यक्रमाची सुरुवात कोलाड आंबेवाडी नाका येथून समाज नेते शामराव पेजे,कातकर,पा रा सानप यांना अभिवादन करून करण्यात आली तर सुरेश मगर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले तर शंकरराव म्हसकर तसेच संघाचे अध्यक्ष भूषण बरे यांनी आपले विचार मांडले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सतीश भगत यांनी केले तर आभार अनंत थिटे यांनी मानून सांगता करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *