वीस हजारांची लाच मागणारा तलाठी संजय पाटील 16 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत

Share Now

295 Views

अलिबाग (अमूलकुमार जैन) पनवेल येथील एका सोसायटीचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी लाचखोर तलाठी संजय विष्णू पाटील, (वय 55 वर्षे,तलाठी, सजा सुखापुर सिल्लोत्तर, ता.पनवेल, जि. रायगड सध्या मंडळ अधिकारी, नेमणूक अलिबाग तहसील कार्यालय (वर्ग-3)* रा. नवरत्न को-ऑपरेटिव्ह सोसायटी, बी/201,प्लॉट नं. एफ/8, सेक्टर नं. ८, खांदा कॉलनी,महात्मा शाळेजवळ, ता.पनवेल, जि. रायगड)यास नवी मुंबईच्या लाचलुचपत विभागाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात 13 जानेवारी 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तद्नंतर त्यास पनवेल येथील न्यायालयात हजर केले असता त्यास 16 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.याबाबतची सरकारतर्फे फिर्याद महिला पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण यांनी दिली होती.

पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील लाचखोर तलाठी संजय पाटील याने तक्रारदार यांचे राहते मातोश्री को-ऑपरेटिव्ह सोसायटी चे नाव सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितली होती मात्र तक्रारदार यांनी तडजोड करीत दहा हजार रुपये लाच देण्याचे मान्य केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *