कोलाड हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ ! बंद घरे फोडली सोन्याच्या दाघीने सह रोख रक्कम लंपास !

Share Now

45 Views

रोहा (कल्पेश पवार) कडाक्याच्या थंडीचा फायदा उठवत ऐन सणा सुधीत कोलाड वरसगाव परिसरातील भीरा फाटा जवळ असणाऱ्या सी 2 हंस-प्रीत रेसिडेन्सी मधील दोन घरे चोरट्यांनी फोडली असून यात रोख रक्कम सह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.या चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या चोरीचा तपास कोलाड पोलीस करीत आहेत.
       
या बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहिती नुसार,कोलाड वरसगाव परिसरातील भीरा फाटा जवळ असणाऱ्या हंस-प्रीत रेसिडेन्सी मध्ये राहणारे संतोष संजय सानप व मंगेश मनोहर राजीवडे यांच्या राहत्या बंद घरातून दरवाजांचा कडी कोयंडा व कुलुप तोडुन त्यावाटे चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटाचा लॉक तोडुन त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे.तरी या मध्ये 41.250/- रुपये एक सोन्याचे गंथन 27 ग्रॅम वजानाचे पैंडल व दोन्ही बाजूला पट्टी व त्यामध्ये काळे मणी असलेल जु.वा.
किं.अं. 2. 22,500/रुपये एक सोन्याची चैन 15 ग्रॅम वजनाची गोप टाईप असलेली जु.वा. किं. अं. 3.39,000/- रुपये एकुण सोन्याच्या अंगठया त्यामध्ये एक ग्रॅम, एक 5 ग्रॅम, एक 4 ग्रॅम, व बाकी प्रत्येकी 2 ग्रॅम वजनाच्या जु.वा. किं. अं. 4. 11,250 /रुपये एक सोन्याचा हार 7.5 ग्रॅम वजनाचा जु. वा. किं. अं. 5.11,250 रुपये एक जोड चोरीस गेलेल्या अंतर्भूत | सोन्याचे कानातली कुडी 7.5 ग्रॅम वजनाचा जु.वा. किं.अं. 6.03,
750/ रुपये एकुण 4 सोन्याच्या बांगडया प्रत्येकी ग्रॅम वजनाचा जु. वा. किं. अ7.03,000/ रुपये एक सोन्याची नथ 2 ग्रॅम वजनाची जु.वा. किं. अ 8. 15,000/रुपये एक जोड सोन्याचे कानातली कुडी 10 ग्रॅम वजनाची जु. वा. किं. अ9.03,000/रुपये एक सोन्याची नथ 2 ग्रॅम वजनाची जु.वा. किं. अ 10.03,000/रुपये एक लहान मुलीचे कानातले रिंगाचा सोन्याचा जोड 3 ग्रॅम वजनाची जु.वा. किं.अ 11. 03,000/रुपये एक लहान मुलीचे चांदीचे ताळे,पैजण जोड,कमरेची साखळी, मनगटाचे कडे असे सुमारे 100 वजनाचे चांदीचे दागिने जु.वा. किं.अ. 12.13,000/रुपये असे एकूण १७६,000/ रुपये किंमती ची चोरी झाली आहे.

याबाबत कोलाड पोलीस ठाणे येथे गु.र.नं 0003/2023 भा.द.वी.क.380,457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन ,या चोरीचा अधिक तपास सपोनि अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.