कु.हन्नत शेख यांना अविष्कार संशोधनात राज्यस्तरीय सुवर्णपदक

Share Now

124 Views

उरण (विठ्ठल ममताबादे ) कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी हन्नात युसुफ शेख हीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा 2023 मध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. व Ph.D. विद्यार्थी या विभागातून महाराष्ट्र राज्य स्तरावर सुवर्णपदक प्राप्त केले. तिने “A Study of Islamic Marriages: Unveiling the Facts to Wipe Off Myths” या विषयावर संशोधन करून पोस्टर आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारा सादरीकरण केले. तीच्या यशाबद्दल मुबंई विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव, संस्थेचे उपाध्यक्ष शिषीरदादा धारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपचंद्र शृंगारपुरे,उरण महाविद्यालयाची व्यवस्थापन समिती, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. बळीराम एन.गायकवाड, प्रा. के. ए. शामा, प्रा. व्ही. एस.इंदुलकर, IQAC समन्वयक डॉ. ए. आर. चव्हाण आणि इतर सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व कौतुक करण्यात आले. व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *