मेढा (वार्ताहर) मेढा ग्रा.पं.जेष्ठ माजी सदस्य सुरेंद्र जाधव सध्याचे उपसरपंच रविंद्र जाधव यांच्या मातोश्री इंदिरा एकनाथ जाधव यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या.
इंदिराबाई यांचे गावात सर्वांसोबत आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध होते. गावातील ग्रामस्थांच्या सुख, दुःखाच्या आणि अन्य सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा. त्यांना भजन, किर्तन यांसारख्या धार्मिक कार्यक्रमाची प्रचंड आवड असे. त्यांच्या चांगल्या व्यक्तिमत्वामुळे अनेकांना इंदिराबाई आपल्यास्या वाटायच्या. त्यांना २ मुले,२ मुली, सुना, १० नातवंडे, १३ पतवंडे. असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी असंख्यांचा जनसागर लोटला होता. इंदिराबाई यांच्या जाण्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरी त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार ता. २७/०१/२०२३ रोजी वाकेश्वर मंदिर तळावजवळ मेढा येथे होणार आहे.
उत्तरकार्य ता. ३०/०१/२०२३ रोजी राहत्याघरी, गवळआळी – मेढा येथे होणार आहे.