जि.प.शाळा वशेणी येथे उकडलेली अंडी वाटप कार्यक्रम संपन्न

Share Now

31 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) जनसेवेतून आनंद देणा-या वशेणी इतिहास संपादकीय मंडळाकडून नुकताच उरण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वशेणी येथील मुलांना उकडलेली अंडी वाटण्यात आली. शालेय पोषण आहारात पोषक मूल्य मिळावी आणि आहारात नेहमी पेक्षा वेगळेपणा यावा या हेतूने वशेणी इतिहास संपादकीय मंडळाकडून शाळेतील 127 मुलांना उकडलेली अंडी वाटप करण्यात आली. या वेळी वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे कार्यरत सदस्य डाॅक्टर रविंद्र गावंड, गणपत ठाकूर, गणेश खोत, पुरूषोत्तम पाटील, निलेश पाटील, मुख्याध्यापक अनंता पाटील, शिक्षण विभाग प्रतिनिधी ज्योती ठाकूर आणि मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्रनाथ म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते. या वेळी मुख्याध्यापक अनंता पाटील यांनी वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे आभार मानले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.