रोहा : बेधडक चोरी, एकाच मजल्यावरती तीन ब्लॉक चोरट्यांनी फोडले

Share Now

29 Views

रोहा (राजेंद्र जाधव) रोहा शहर, नजिक ग्रामीणात बेधडक अगदी दिवसाढवळ्या चोरीच्या घटना घडत असल्याचे समोर आले. शहरात चोरीच्या घटना सुरू असतानाच ग्रीन पार्क रेसिडेन्सी इमारतीत भर दिवसा दुपारी चोरट्याने ब्लॉक उघडुन चांगलाच डल्ला मारल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रोहा कोलाड रोडलगत असलेल्या गर्दीच्या ब्रेंडा कॉम्प्लेक्स समोरील ग्रीन पार्क रेसिडेन्सी इमारतीत भरदिवसा शुक्रवारी दुपारी चोरी झाली. दोन तीस ते चारच्या दरम्यान तिसऱ्या मजलावरील घरातील मंडळी कामानिमित्त घराबाहेर गेल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी चोरी केल्याचा अंदाज व्यक्त झाला. चोरट्यांनी घराची कडी कोयंडे व लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातील दागिने व रोखड लंपास केली असल्याचे समोर आले. चोरीची घटना समजताच रोहा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. एपीआय वायंगणकर व पोलीस धायुगुडे यांनी पंचनामा केला आहे. याआधी दोनच दिवसापूर्वी कोलाड भिरा फाट्या लगतच्या एकाच बिल्डिंगमध्ये पाच ब्लॉक फोडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

चोरीबाबत गुन्ह्याची नोंद रोहा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, बेधडक दिवसाढवळ्या चोरीच्या घटना वाढल्याने सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे, तर रोहा पोलीस चोरीच्या घटना रोखण्यात यशस्वी ठरतात का ? हे पाहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.