डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये तांत्रिक पुस्तकांचे मराठी मध्ये भाषांतर करण्याकरिता दोन दिवसीय अभिमुखता मुक्ता कार्यक्रम संपन्न

Share Now

423 Views

रोहा (उद्धव आवाड ) दिल्ली ने NEP २०२० च्या अंतर्गत सुरू केलेला मराठीमध्ये पुस्तक भाषांतराचा उपक्रम महाराष्ट्रात राबवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची गतवर्षीप्रमाणे यावर्षी निवड झाली आहे. डॉ. संजय नलबलवार हे या उपक्रमाचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत विद्यार्थ्यांना शिकताना माध्यमांचा अडथळा येऊ नये म्हणून मातृभाषेत अभियांत्रिकीचे शिक्षण उपलब्ध व्हावे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे प्रादेशिक भाषांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने मोठा पुढाकार घेतला आहे. AICTE ने अकरा प्रादेशिक भाषांमध्ये इंजिनिअरींग सारखे तांत्रिक विषय सुरू करून पहिले पाऊल उचलले आहे. लवकरच मॅनेजमेंट फिलॉसॉफी अँड आणि हॉटेल मॅनेजमेंट सारखे नॉन टेक्निकल कोर्स प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुचित करते की भाषेच्या प्राधान्य मुळे कोणत्याही विद्यार्थ्यांची भेदभाव केला जाऊ नये त्यामुळे प्रादेशिक भाषांमध्ये तांत्रिक अभ्यासक्रम चालवले जात आहेत तथापि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या तांत्रिक सज्ञा अजूनही इंग्रजीच असतील कारण या वैज्ञानिक संज्ञा आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांनी एकसमान वापरलं पाहिजेत.

मातृभाषेत मधून शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचे ज्ञान प्रभावीपणे आत्मसात करता येईल संकल्पना समजून घेणे सोपे जाईल त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. या उपक्रमामध्ये भाषेच्या अडथळ्यांमुळे उच्च शिक्षण घेण्यास मुकलेले अधिक अधिक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतील.अशा प्रकारचे शिक्षण व्यवस्थेत निष्पक्षतेला चालना देईल आणि सर्व विद्यार्थ्यांना समान पातळीवर आणेल, हा विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आणि समवयस्कांमध्येही सहज माहितीची देवाणघेवाण करेल. एका शीर्ष भारतीय व्यवस्थापन महाविद्यालयांच्या संचालकांच्या मते केवळ दहा भारतीय अस्खलितपणे इंग्रजी बोलू शकतात. त्यामुळे प्रादेशिक भाषांमधील अभ्यासक्रम सुरू केल्याने मोठ्या विद्यार्थी लोकसंख्येला दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल ज्यामुळे चांगले शैक्षणिक गुण मिळतील. जर सिद्धांत -आधारित विषय जे सामान्यतः इंग्रजी भाषेत बहुतेक उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकवले जातात जर ते प्रादेशिक भाषांमध्ये शिकवले गेले तर त्यांच्या मातृभाषेत प्रविण विद्यार्थ्यांना ते अधिक मनोरंजक आणि परिणामकारक वाटू शकतात. त्यामुळे प्रादेशिक भाषांमधील गैरतांत्रिक अभ्यासक्रमाचा अभ्यास केल्यास अधिक स्पष्टता येईल त्यामुळे शिक्षण सोपे होईल.

यावर्षी द्वितीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची ८८ पुस्तके मराठी भाषांतरित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील उच्च विद्याविभूषित विषय तज्ञांची निवड करण्यात आली आहे सदर उपक्रमासाठी विषय तंत्रज्ञान करिता दोन दिवसीय अभीमुख कार्यक्रम दिनांक २८ व २९ डिसेंबर २०२२ रोजी विद्यापीठात पार पाडण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये 239 विषय तज्ञांनी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी माननीय कुलगुरू डॉ.कारभारी काळे,माननीय कुलसचिव डॉ.भगवान जोगी,अधिष्ठाता डॉ. संजय नलबार डॉ. हर्षदीप जोशी व AICTE चे संस्थीय विकास विभागाचे संचालक डॉ. श्रीशैल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. माननीय कुलगुरूंनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून गतवर्षी झालेल्या भाषांतर उपक्रमाची माहिती करून दिली. तसेच गतवर्षी पार पाडलेल्या उपक्रमामध्ये भाषांतरित केलेल्या २० पुस्तकांच्या भाषांतराची व पुनरावलोकनकाराचे कौतुक केले. या विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भगवान फ. जोगी यांनी या विद्यापीठाला ही संधी प्रदान केल्याबद्दल AICTE दिल्ली यांचे आभार व्यक्त केले व सर्व विषय तज्ञांना पुढील काम करण्यासाठी प्रोत्साहित केले अधिष्ठाता डॉ. संजय नलबार यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. विद्यापीठात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच त्यांनी गतवर्षी राबविलेल्या भाषांतर व उपक्रमाचे अनुभव सांगितले त्या अनुषंगाने यावर्षी सुमारे चौपट जास्त काम करावयाचे आहे परंतु आपल्याकडे मागील वर्षाचा अनुभव असल्याकारणाने आपण हे काम दुप्पट वेगाने करू शकतो याची ग्वाही दिली. डॉ. श्रीशैल्य कांबळे यांनी भाषांतरकारांना व पुनरावलोकनकारांना संपूर्ण भाषांतर प्रक्रियेची माहिती दिली.त्यांनी भाषांतर करताना कोणते तांत्रिक शब्द कोणत्या प्रकारे भाषांतरीत करावे ,साधारणपणे घडून येणाऱ्या चुका कशा टाळाव्यात, एका पुस्तकावर काम करणाऱ्या तज्ञांनी मिळून काम कसे करावे,टुलचा वापर करून भाषांतर करताना काय काळजी घ्यावी,मुद्द्यांचा अर्थ न बदलता भाषांतर कसे करावे याबद्दल सखोल माहिती दिली.

दुपारच्या सत्रांमध्ये IIT बॉम्बे येथे उडान टीम ने भाषांतर करण्यासाठी वापरावयाच्या उडान टूल बद्दल तांत्रिक माहिती दिली. सर्व विषय तज्ञांनी प्रात्यक्षिकांद्वारे उडान टूलचे प्रशिक्षण घेतले. डॉ. हर्षदीप जोशी यांनीAICTE चे डॉ. श्रीशैल कांबळे यांचे या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केल्याबद्दल आभार व्यक्त केले. सदरच्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल माननीय कुलगुरू डॉ. कारभारी काळे माननीय कुलसचिव डॉ. भगवान फ. जोगी, समन्वयक डॉ. संजय नलबलवार यांचे आभार मानले. आणि विद्युत व दूरसंचार विभागामधील व्यवस्थापन समितीमधील सर्व सदस्यांचे सदर कार्यक्रमाची पूर्वतयारी केल्याबद्दल आणि कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली .

Leave a Reply

Your email address will not be published.