‘आम्ही पिरकोनकर’ समूहाच्या रंगोत्सवात रंगले शेकडो कलाकार

Share Now

204 Views

उरण (विठ्ठल ममताबादे ) आम्ही पिरकोनकर समूहच्या वतीने ’रंगोत्सव-२०२३’चे आयोजन करण्यात आले होते. पंचरत्न इंग्लिश मेडीअम स्कूल, पिरकोन येथे संपन्न झालेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेस उत्तम प्रतिसाद लाभला. सदर रंगोत्सवामध्ये चित्रकला, रांगोळी, हस्ताक्षर अशा विविध प्रकारांमध्ये तब्बल १७० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. नंदकुमार साळवी, रुपेश पाटील, नवनीत पाटील, जितेंद्र गायकवाड यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ख्याती असणाऱ्या परीक्षकांची उपस्थिती हे या स्पर्धेचे आकर्षण होते. पिरकोन ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच कलावती पाटील, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले. उद्घाटनीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुषार म्हात्रे (सचिव) यांनी केले तर सूत्रसंचालन राजेंद्र ठाकूर (खजिनदार) यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ.कल्पेश गावंड यांनी भूषविले. गिरीश पाटील, जगदिश गावंड यांनी व्यासपीठाची जबाबदारी पार पाडली. आम्ही पिरकोनकर समूहाच्या वतीने रविंद्र गावंड, प्रमोद पाटील, सुरेंद्र गावंड, मनोहर म्हात्रे, प्रकाश जोशी, गणेश गावंड, भूषण गावंड, चंद्रशेखर भोमकर, मनीष पाटील, अमर पाटील, हेमंत गावंड यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यात मोलाची भूमिका बजावली. याप्रसंगी आम्ही पिरकोनकर समूहाच्या वतीने विद्यालयाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सत्कार करण्यात आला. समूहाकडून पंचरत्न इंग्लिश मेडिअम स्कूल साठी सहा पंखे भेट देण्यात आले.विलास पाटील आणि समूहाच्या सदस्यांनी सदर भेट अनंत गावंड (चेअरमन) यांच्याकडे सुपूर्द केली.

स्पर्धेदरम्यान सामाजिक कार्यकर्त्या रेखा घरत, तेजश्री पाटील यांनी कार्यक्रमाला भेट देऊन विशेष शुभेच्छा दिल्या.नंदकुमार साळवी यांनी रांगोळीचे प्रात्यक्षिक दाखवले तर जितेंद्र गायकवाड यांनी प्रात्यक्षिकातून चित्रकलेचा अभिरूप नमुना देऊन स्पर्धकांना मार्गदर्शन केले. दिवसभर रंगलेल्या या स्पर्धेत स्पर्धकांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. चित्रकारांच्या चित्रांनी सर्वांनाच भूरळ पाडली. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. यासह सुधाकर पाटील यांच्याकडून विजेत्यांना ‘झुंज क्रांतिवीरांची’ हे पुस्तक भेट देण्यात आले. समूहाचे सदस्य अशोक गावंड, गिरीश पाटील, प्रकाश जोशी, गणेश गावंड, महेंद्र गावंड यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. समूहाचे अध्यक्ष चेतन अनंत गावंड यांनी सर्व सहभागी स्पर्धक, परीक्षक पालक आणि सर्व सहकारी मित्रमंडळीचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

रंगोत्सव स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

१. हस्ताक्षर स्पर्धा-(मराठी)
मोठा गट (वय १२ ते १८)
प्रथम: ऋतुजा मिथुन म्हात्रे (जासई)
द्वितीय: तन्वी किशोर पाटील (खोपटे)
तृृतीय: नुपूर विरेंद्र म्हात्रे (करंजा)

खुला गट (वय १८ पेक्षा जास्त)
प्रथम: समिर शंकर म्हात्रे (कळंबुसरे)
द्वितीय: हेमाली रोशन पाटील (कोप्रोली)
तृृतीय: तुषार परशुराम पाटील (पाले)

हस्ताक्षर स्पर्धा-(English)
मोठा गट (वय १२ ते १८)
प्रथम: कशिश कैलास पाटील (विंधणे)
द्वितीय: मैत्री गणेश ठाकूर (पिरकोन)
तृृतीय: प्रणाली हरिश्चंद्र म्हात्रे (वशेणी)

खुला गट (वय १८ पेक्षा जास्त)
प्रथम: दिपा चेतन गावंड (पिरकोन)
द्वितीय: प्रमोद बाळकृष्ण पाटील (पिरकोन)
तृृतीय: तुषार चंद्रकांत म्हात्रे (पिरकोन)

२. रांगोळी स्पर्धा:
मोठा गट (वय १२ ते १८)
प्रथम: अंश जितेंद्र पाटील (डोंगरी)
द्वितीय: ऋतुजा मिथुन म्हात्रे (जासई)
तृृतीय: हर्षद बब्रुवान म्हात्रे (केळवणे)
उत्तेजनार्थ: पार्थिव प्रकाश पाटील (पिरकोन)

खुला गट (वय १८ पेक्षा जास्त)
प्रथम: मयुर रघुनाथ म्हात्रे (चिरनेर)
द्वितीय: मनोहर बाळकृष्ण ठाकूर (चिरनेर)
तृृतीय: रचना पवन गोसावी (पनवेल)
उत्तेजनार्थ: प्राजक्ता अनिल गावंड( पनवेल)

३. चित्रकला स्पर्धा
लहान गट (३ ते ९ वर्षे)
प्रथम : हंसिका अजय तांडेल (सोनारी)
द्वितीय: स्वरा जितेंद्र पाटील (पाणदिवे)
तृतीय: अयान मनोहर ठाकूर (चिरनेर)
उत्तेजनार्थ: आदित्य महेंद्र पाटील (पिरकोन)

मध्यम गट (९ ते १४ वर्षे)
प्रथम : अनुज गुरूनाथ पाटील (कुंडेगाव)
द्वितीय: परी पवन गोसावी (पनवेल)
तृतीय: कृतेश भरत पाटील (कुंडेगाव)
उत्तेजनार्थ: वेदांती गिरीश पाटील (बामणडोंगरी)

मोठा गट (१२ ते १८ वर्षे)
प्रथम : दिया सुजितकुमार म्हात्रे (गोवठणे)
द्वितीय: दिर्वीता मधुकर तांडेल (सोनारी)
तृतीय: ग्रिषा कुंदन कडू (नवघर)
उत्तेजनार्थ: पार्थिव प्रकाश पाटील (पिरकोन)

खुला गट (१८ पेक्षा जास्त)
प्रथम : दिपेश दत्ताराम पांचाळ (करंजा)
द्वितीय: समाधान रामचंद्र जोशी (पिरकोन)
तृतीय: रश्मी किशोर पाटील (पिरकोन)
उत्तेजनार्थ: कोमल विजय घरत (उरण)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *