चिंतामणराव केळकर विद्यालयात क्रिकेट क्रीडा संकुलाचे उद्घाटन माध्यमिक शाळेतील राज्यातील पहिलेच क्रिकेट प्रशिक्षण केंद्र अलिबाग

Share Now

98 Views

अलिबाग ( अमूलकुमार जैन) चिंतामणराव केळकर विद्यालयात क्रिकेट क्रीडा संकुलाचे उद्घाटन पालकसंघाचे अध्यक्ष ॲड परेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. माध्यमिक शाळेतील राज्यातील हे पहिलेच अद्यावत क्रिकेट प्रशिक्षण केंद्र ठरले आहे. या प्रशिक्षण केंद्रातून केळकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रिकेटचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. यावेळी दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे, विश्वस्त सुरेश भावे, डॉ राजीव धामणकर, ॲड सुरेंद्र जोशी, संजय राऊत आदींसह पालक, सर्व मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे पुणे येथील मंदार दळवी हे विद्यार्थ्यांस प्रशिक्षण देणार आहेत. बॉलिंग मशीनचा 35 ते 180 स्पीड असणार आहे. अस्ट्रो टर्फच्या तीन विकेट, बॉलिंग मशीन क्रिकेट विषयीचे उच्च तंत्रज्ञान लेव्हल तीन कोचकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रकाश पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुरू राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.