रायगड जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर

Share Now

278 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) नेहरु युवा केंद्र- अलिबाग ( भारत सरकार ) महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान- पाणदिवे आणि
वटवृक्ष सामाजिक संस्था- उलवे यांच्या संयुक्त विद्यमाने 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन “वनवणवा थांबवा- वन व वन्यजीव वाचवा” ह्या एकाच विषयावर आयोजित केलेल्या रायगड जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक हरिश्चंद्र नामदेव पाटील- पनवेल, द्वितीय क्रमांक नैनिता नरेश कर्णिक- मुरूड, तर तृतीय क्रमांक विजय राम साईलकर- पाली ह्या स्पर्धकांनी पटकविले. त्याचप्रमाणे पाच उत्तेजनार्थ म्हणुन चैताली किरण म्हात्रे- चिरनेर, प्राजक्ता अनिल गावंड- करंजाडे, सन्मेश मंगेश भोपी- मुरुड, स्वयंम धर्मा ओवळेकर- उलवे, आणि नम्रता मनोहर पवार- खालापूर ह्या स्पर्धकांची निवड करण्यात आली. ही निबंध स्पर्धा यशस्वी होण्यामागे परिक्षक म्हणुन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते विद्याधर गोपीनाथ पाटील, स्नेहल देवदत्त पाटील शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे विशेष आभार नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक निशांत रौतेला यांनी केले. खुली निंबध स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामिण तसेच शहरातील शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेवून स्पर्धेची चूरस वाढवली. लवकरच बक्षिस वितरण समारंभ आयोजित करुन विजेत्यांना पारितोषिके देवुन गौरविण्यात येतील तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग सन्मानपत्र वाटप करण्यात येतील असे मत महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *