शैक्षणिक साहित्यांचे वाटप करून देवांश भोईर यांनी साजरा केला आपला वाढदिवस

Share Now

276 Views

उरण (विठ्ठल ममताबादे ) वाढदिवस म्हंटला की पार्टी, पिकनिक, फिरायला जाणे, हॉटेलात जेवणे असा कार्यक्रम ठरलेला असतो. अनेक जण याच पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करतात. पण या सर्व गोष्टीना छेद देत जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांचे सुपुत्र देवांश विजय भोईर यांनी आपला वाढदिवस जांभूळपाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व शैक्षणिक साहित्याचे वाटप करून साजरा केला.या कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापिका उज्वला पाटील, शिक्षिका उज्वला फोफेरकर, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, अर्चना भोईर,भक्ती भोईर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.सर्वच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी हसू उमटले होते.देवांश यांनी केलेल्या कार्याचे, उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *