रोहा (वार्ताहर) आरती एंटरप्रायझेज पुरस्कृत स्वाद महाराष्ट्राचा मराठमोळ्या चवीचा श्री मोरया स्नॅक्स उपहार गृहाचे उद्घाटन गुरुवार दि. २६ जानेवारी रोजी आ. अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
स्वाद महाराष्ट्राचा मराठमोळ्या चवीच्या प्रमाणे रोहेकरांना मराठमोळी चव अनुभवयास मिळणार आहे. श्री मोरया स्नॅक्स उपहार गृह रोहा शहरात जिजाऊ महिला बचत भवन येवले चहाच्या शेजारी उघडण्यात आले असून या चविष्ट खाद्य पदार्थाचा स्वाद घेण्यासाठी रोहेकर नागरीक उद्घाटना पासूनच गर्दी करत आहेत.उद्घाटन प्रसंगी मा. पालकमंत्री तथा आ.आदिती तटकरे यांसह अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी श्रीमती शोभा दिवेकर, श्रीमती उमा खोत, मा. उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर, जितेंद्र दिवेकर, अजय खोत, मानसी दिवेकर ,स्मिता दिवेकर, आरती खोत, ज्येष्ठ नगरसेवक अहमद दर्जी, मा. गटनेते महेंद्र गुजर, मा. उपनगराध्यक्ष महेश कोलटकर, मा. सभापती समीर सकपाळ, शहराध्यक्ष अमित उकडे, अलीम मुमेरे, रवी चालके, रमेश साळवी, सणाऊल्ला दर्जी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.