शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष्याच्या उरण तालुका व शहराच्या वतीने निवडणूक आयोगाच्या निर्णया विरोधात जोरदार निदर्शने

Share Now

172 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या उरण तालुका व शहराच्या वतीने नुकताच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व चिन्ह बाबत जो निर्णय दिला आहे त्या एकतर्फी निवडणूक आयोगाच्या निर्णया विरोधात सोमवार दिनाकं 20 फेब्रुवारी 2023 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शिवसेना शहर शाखेसमोर जोरदार निदर्शने करून निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर व तालुका संघटक बी एन डाकी यांनी मार्गदर्शन केले.

या निषेध कार्यक्रम प्रसंगी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, तालुका संघटक बी एन डाकी, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, उपतालुका संघटक के एम घरत, माजी नगरसेवक निलेश भोईर, नगरसेविका वर्षा पठारे, उपशहरप्रमुख कैलास पाटील, महेश वर्तक, महिला आघाडीच्या ज्योती म्हात्रे, श्रीमती वंदना पवार, मनीषा ठाकूर,रझिया शेख, माधुरी चव्हाण, मुमताज भाटकर, हुसेना शेख, सायरा खान, लता राठोड, संजना कोष्टी, रुकसना सय्यद, विभागप्रमुख एस के पुरो, संदेश पाटील, वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष चेतन म्हात्रे, धीरज बुंदे, संतोष मसुरकर, घारापुरी सरपंच बळीराम ठाकूर, सोनारी उपसरपंच मेघशाम कडू, शाखाप्रमुख दिनेश घरत, एल जी म्हात्रे,हरीचंद्र पाटील, हेमंत पाटील, नितीन ठाकूर, नियाज भाटकर, समीम खान, इम्रान खान, मोहम्मद शेख, सर्व आजी माजी पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *