म्हसळा महसूल विभागाचा चिल्लरसाठी चिरीमिरी कारभार, लाखो रुपयांचा महसूल बुडवत अधिकाऱ्यांच्या संरक्षणात रात्रीची बेकायदेशीर रेती तस्करी सुरु

Share Now

423 Views

म्हसळा: (निकेश कोकचा ) म्हसळा महसूल विभाग सध्या तेजीत असून, कोकणातलं काळा सोना बोलल्या जाणाऱ्या रेतीची तस्करी सर्रास अधिकाऱ्यांचा संरक्षणात सुरु असल्याचे चित्र मध्यरात्री शहरातील रस्त्यावर पहावयास मिळत आहे. म्हसळा तालुक्यातून वाहणाऱ्या सावित्री नदीच्या पत्रातून शासनाने अटी शर्ती नुसार हातपट्टी रेती साठा करण्यासाठी एका बोटीला अंशता परवानगी दिली आहे. मात्र या अटी शर्ती पायदळी तुडवत ठेकेदार सर्रास बेकायदेशीर रित्या अतिरिक्त रेती साठा उपसा करत आहे.

बेकायदेशीर रेती साठा उपसा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी म्हसळा व श्रीवर्धन महसूल विभागाच्या संरक्षणात म्हसळा तालुक्यातील नविवाडी येथील रेती डेपो वरून निघणाऱ्या बेकायदेशीर म्हसळा तालुक्यातील 17 व श्रीवर्धन तालुक्यातील 20 गाड्यांना रात्रीच्या वेळेस अधिकाऱ्यांचा चिरीमिरी साठी संरक्षण मिळत असल्याचे पाहावयास मिळत आहे. महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या या धोरणामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याची चर्चा चौका चौकात रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *