सापडलेले दागिने केले परत, आजही माणूसकी जिवंत असल्याचे प्रत्यक्ष उदाहरण

Share Now

170 Views

उरण (विठ्ठल ममताबादे )आजच्या धक्काधक्कीच्या व जीवघेण्या स्पर्धेच्या युगात कोणी कोणाकडे ढूंकूनही बघत नाही. एकमेकांकडे वेळच नसल्याने दुस-यांच्या सुखदुखात सामील होणे दुरास्पत होत आहे. अनेक ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणाऱ्याही घटना घडत आहेत.मात्र उरणमध्ये आजही माणूसकी जिवंत असल्याचे प्रत्यक्ष उदाहरण पाहायला मिळाले आहे. गुरुवार दि 23/2/2023 रोजी उरण तालुक्यातील बोरी येथे राहणारे रिक्षाचालक विशाल रोहिदास गावंड हे नेहमी प्रमाणे रिक्षा चालवत होते दुपारी 12 च्या सुमारास ते उरण मधील चारफाटा येथे असताना मंगेश ठाणकर व सुचना ठाणकर या दोन व्यक्ती विशाल यांच्या रिक्षात बसले.त्यांना माउली हॉल नागाव येथे जायचे होते सदर व्यक्ती हे ठाणे जिल्ह्यातील ठाणे स्टेशन जवळ राहतात. सदर प्रवाशी इच्छीत स्थळी नागाव येथे पोहोचवल्यावर विशाल गावंड यांनी आपली रिक्षा चारफाटा येथे स्टँण्डवर रांगेत लावली. त्यानंतर थोड्याच वेळात विशाल यांना त्यांच्या रिक्षात सोने नज़रेस दिसले. सदर सोने कोणाचे आहे ? याबाबत त्यांनी चौकशी सुरू केलें, व्हाटसअप ग्रुप वर सुद्धा त्यांनी मेसेज टाकला. आपल्या मित्रांनाही त्यांनी कळविले. ज्यांचे सोने आहे त्यांनी ओळख पटवून सोने घेवून जावे असे आवाहन त्यांनी केले.

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या मेसेज मूळे रिक्षातून प्रवास करणारे ठाणे जिल्हयातून उरण तालुक्यात आलेले मंगेश ठाणकर व सूचना ठाणकर यांनी विशालशी संपर्क साधला. ओळख पटवून खात्री करूनच विशाल गावंड यांनी दिड तोळ्याचा हातात घालायचा सोन्याचा ब्रेसलेट मंगेश ठाणकर व सूचना ठाणकर यांच्याकडे सुपूर्त केला.यावेळी रिक्षा युनियन मनसे या रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिनेश हळदणकरही उपस्थित होते.गणपती चौकात रीक्षा स्टँण्ड येथे त्यांना सोने परत केले. हरविलेले सोने परत आपल्याला भेटते की नाही या विवंचनेत असताना एका रिक्षा चालकाने त्यांना प्रामाणिकपणे सोन्याचे ब्रेसलेट परत केले. रिक्षा चालकाचे प्रामाणिकपणा बघून ठाणकर कुटूंबांना गहिवरून आले. त्यांनी विशाल गावड यांचे मनापासून आभार मानले.आजच्या धक्का धक्कीच्या व जीवघेण्या स्पर्धेच्या युगात विशाल गावंड यांनी दाखविलेली माणुसकी लाख मोलाची आहे. विशाल गावंड हे ग्राहकांना, प्रवाशी वर्गांना देव मानून त्यांना प्रामाणिक, चांगली सेवा देत असतात. विशाल गावंड हे गेल्या 3 वर्षापासून रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. मी माझे कर्तव्य पूर्ण केले. मला ज्याचे सोने होते त्याला परत करायचे होते. मला प्रवाशांना चांगली सेवा दयायची आहे. मला कोणाची फसवणूक करायची नाही असे यावेळी विशाल गावंड यांनी सांगितले.विशाल गावंड यांनी दाखविलेल्या माणुसकीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *