उर्वशी नृत्यालय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच तत्पर : अध्यक्षा स्नेहा अंबरे

Share Now

205 Views

रोहा : (रविंद्र कान्हेकर) स्पंदन संस्था रोहातील नामांकित नाट्य संस्था आहे. गेली 22 वर्षे बालराज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होणारी रोह्यातील संस्था आहे.गेली अकरा वर्षे बालराज्य नाट्य स्पर्धेत पहिला व दुसरा येण्याचा मान राज्यात मिलविला आहे. कोरोनाच्या काळात दोन वर्षे मुले बाहेर पडले नव्हते. आता नव्याने कोरोनानंतर उर्वशी नृत्यलयाचे भरतनाट्य व वेस्टर्न डान्स क्लासच्या माध्यमातून विद्यार्थी सिरीयल, नाटक व सिनेमात स्पंदनचे विद्यार्थी चमकत आहेत. स्पंदनच्या उर्वशी नृत्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच तत्पर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध होत आहे असे विधान स्पंदच्या अध्यक्षा स्नेहा अंबरे यांनी केले.

यावेळी रोटरी क्लब अध्यक्ष सुरेंद्र निंबालकर, भाटे सार्वजनिक वाचणालय अध्यक्ष किशोर तावडे, उदय ओक, खारगांव सरपंच सलोनी आपणकार, मुख्याध्यापिका जोशी मॅडम, अलका नांदगावकर, सेवानिवृत्त शिक्षिका सुनीता देशमुख, शिरीष अंबरे, स्पंदन संस्थेचे सचिव प्रतीक राक्षे व उर्वशी नृत्यलयाचे विद्यार्थी व पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *