रोहा-(प्रतिनिधी) : रोहा सिटिझन फोरम ट्रस्ट आणि आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. रोह्याचे ग्रामदैवत श्री. धावीर महाराजांच्या मंदीर सभागृहात झालेल्या या शिबिरात अल्पदरात चष्मे वाटप, मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. हॉस्पिटलचे टिम मॅनेजर प्रकाश पाटील, डॉ क्रिझन, अक्षता पार्टे, श्वेता, स्नेहा, सुदामा, सिल्पेश साटम आदींनी रुग्णांची तपासणी केली. रोहा सिटिझन फोरम ट्रस्ट चे अध्यक्ष नितीन परब, प्रदिप देशमुख, मिलिंद अष्टिवकर, दिलीप वडके, श्रीकांत ओक, अहमदशेठ दर्जी, उस्मानभाई रोहेकर, संतोष खटावकर, महेश सरदार, संदीप सरफळे, इल्यास डबीर, दिनेश जाधव, शैलेश रावकर, सचिन शेडगे, परशूराम चव्हाण, अमोल देशमुख, प्रशांत देशमुख, निलेश शिर्के, सिद्देश ममाले, दिनेश मोहिते, समिधा अष्टिवकर, भावेश अग्रवाल, बिलाल मोर्बेकर आदी फोरम च्या सर्व सदस्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. रोहा सिटीझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितिन परब यांनी सहयोगी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
रोहयात मोतीबिंदू शिबिरात १२० जणांची तपासणी ; ३४ रुग्णांच्या शास्त्रकिया

80 Views