वाली ग्रा.पं.चे सरपंच उद्देश देवघरकर यांच्या घराला भीषण आग, लाखोंचे नुकसान

Share Now

700 Views

धावीर रोड (अंजूम शेटे) रोहा तालुक्यातील वाली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच उद्देश देवघरकर यांच्या राहत्या घराला अचानक भीषण आग लागल्याची दूर्दैवी घटना घडली. बुधवार दिनांक १ मार्च रोजी सकाळ १०:३० वा. दरम्यान घराला आग लागल्याचे निदर्शनास आले. सुरूवातीला थोड्या प्रमाणात लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण करत आगीत संपुर्ण घर भस्मसात झाले असून या आगीत कुटुबियांचे लाखो रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे. 

फेब्रुवारी-मार्च महिन्यात उन्हाळ्याच्या झळा प्रचंड प्रमाणात जाणवत आहेत. वातावरणात कमालीची रखरखता वाढली असताना एखाद्याचा राहते घर आगीच्या भक्ष्यस्थानी गेला तर काय परिस्थिती ओढवू शकते ह्या कल्पनेनेच अंगावर काटा उभा राहतो. प्रत्यक्षात ही परिस्थिती कोणावरही येऊ नये असे वाटत असतानाच रोहा तालुक्यातील वाली येथे 

बुधवार दि. १ मार्च रोजी सकाळी ग्रा.पं. सरपंच उद्देश देवघरकर यांच्या घराला आग लागल्याची घटना घडली. सुरूवातीला थोड्या प्रमाणात लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केले आणि बघता बघता संपुर्ण घर आगीत भस्मसात होत. होत्याचे नव्हते झाले. आगीचे खरे कारण कळू शकले नसले तरी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीमुळे घराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान,  सरपंच उद्देश देवघरकर हे परिसरात सर्वांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. आता त्यांच्यावरच प्रसंग आल्यामुळे त्यांना मोठ्या प्रसंगाला सामोरे जावे  लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *