नागोठणे :(याकुब सय्यद) सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान ही समाजसेवी संस्था गेली अनेक वर्ष सीमेवरील जवानांसाठी राखी पाठवत असतात. २०२२ साली देखील सुराज्य ने १५००० राख्या सीमेवरील जवानांना पाठवून आपले कर्तव्य पार पाडले.
यनिमित्त रोहातील ३४ शाळा व जवळपास १०८ विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा तसेच सामाजिक संस्थाचा सन्मान सुराज्यच्या वतीने करण्यात आला. सुराज्यने रोहा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविले त्यात तब्बल १० शाळानी सहभाग नोंदविला. 38 वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प या स्पर्धेत सहभागी होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन नवनिर्वाचित अध्यक्ष किरण कानडे, महिला अध्यक्ष प्रिया जंगम, कार्यक्रम प्रमुख शुभम पतंगे यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थापक रोशन चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
सदर कार्यक्रमाच्या उदघाट्नप्रसंगी व पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, राष्ट्रवादी काँग्रेस रोहा शहर अध्यक्ष अमित उकडे,मा. नगरसेवक महेंद्र गुजर, श्रद्धाताई घाग,कामगार नेते विलास डाके, भाजप युवा तालुका अध्यक्ष महेश ठाकुर, जयश्री भांड, सुप्रिया पाशीलकर, छाया बर्गे, ज्योती तेंडुलकर, जोशी मॅडम उपस्थित होते. यावेळी पर्यवेक्षक म्हणून विज्ञान सर,नितीन प्रधान सर, सोहमजी जाधव यांनी भुमिका पार पाडून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. स्पर्धेस साईराज विलास साळुंखे व रुतांश चेतन गोसावी या (के.इ.एस.इंग्लिश मेडीयम शाळा) यांचा प्रथम, पुष्कर टिळक (जे.एम.राठी )द्वितीय, सिद्धेश भोय व अथर्व धाटावकर (के.इ.एस.इंग्लिश मेडीयम शाळा) यांचा तृतीय क्रमांक आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया कासार, हाजी कोठारी यांनी केले.
कार्यक्रमासाठी विनित वाकडे वैभव कुलकर्णी, राजेंद्र कासार, प्रसाद पाटुकले, कुणाल आंबले, कौशल्य गायकवाड, परेश चितळकर,अनिल घरजाळे,शिवम जंगम, दर्शना चव्हाण,रोहित खराडे यासह इतर सदस्यांनी नियोजनात सहकार्य केले.यावेळी मुख्याधिकारी श्री. चव्हाण साहेब यांचे सुराज्यच्या वतीने विशेष धन्यवाद मानले.