भेंडखळमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

Share Now

57 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) सालाबादप्रमाणे तिथीनुसार फाल्गुन कृष्ण तृतीया म्हणजेच शिवजयंयी उत्सव. ही शिवजयंती पुष्पा-परशुराम प्रतिष्ठान व आदर्श सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ भेंडखळ यांच्या संयुक्त विद्यमाने भेंडखळ मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) रायगड उपजिल्हा प्रमुख अतुल भगत तसेच भेंडखळ गावाच्या उपसरपंच संगिता मेघश्याम भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. आदर्श सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष वैभव भगत, भेंडखळ शिवसेना शाखाध्यक्ष राहुल भगत तसेच मंडळाचे सचिव जय भगत, खजिनदार राकेश भगत व भेंडखळ ग्रामस्थ तसेच महिला वर्ग यावेळी उपस्थित होते. पुष्पा-परशुराम प्रतिष्ठान व आदर्श सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ भेंडखळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिवजयंती निमित्त विविध उपक्रमास जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published.