पनवेल ( प्रतीनिधी) रविवार दि. 26/03/2023 रोजी संध्याकाळी 4.00 ते 8.00 या वेळेत पनवेल कल्चरल सेंटरच्या सभागृहात गुन गाऊॅं कैसे तुम्हरो या कार्यक्रमातून पंडीत वामनराव भावे यांची स्मृतिचित्रे उलगडणार आहेत. रोहा, माणगाव, मुरूड परिसरात शास्त्रीय संगीताचा प्रसार करणारे रोह्यातील पंडीत वामनराव भावे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून या परिसरासह पनवेल, मुंबई, पुणे कल्याण अशा दूरवर पसरलेल्या त्यांच्या शिष्यांच्या मुरूड येथील पै.आबीद हुसेन स्मृती संगीत मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या अभिनव कार्यक्रमातून पं. वामनराव भावे यांच्याबद्दलची छायाचित्रे, आठवणी, चीजा या माध्यमातून त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला जाईल. शहरापासून दूर असलेल्या भागात शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या पं. वामनराव भावे यांच्याविषयीच्या ह्या माहितीपूर्ण व रंजक कार्यक्रमातून एका संगीतोपासकाच्या जीवनपटाचा आनंद रसिकांनी घ्यावा असे आवाहन मंडळाचे कार्यवाह डॉ. रविंद्र नामजोशी यांनी केले आहे.