नविन शेवा गावात श्रीराम मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रम उत्साहात संपन्न

Share Now

63 Views

उरण (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील नविन शेवा गावात शनिवार दि 25 मार्च 2023 ते सोमवार दि 27 मार्च 2023 दरम्यान परमपूज्य श्री अध्भुतानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेशपूजन, पुण्य हवन मातृकापूजन, नांदी श्राद्ध,देवतास्थापन नवग्रह मंडळ, जलाधिवास ग्रह यज्ञ,वास्तु मंडळ हवन, मूर्ती प्राण प्रतिष्ठापणा, कलशारोहण, रुद्राभिषेक,आरती आदि धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. साडेतीन दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह सुद्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सोमवार दि 27 मार्च 2023 रोजी नविन शेवा गावातील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार व मुर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे )रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, ग्रामसुधारणा मंडळ नविन शेवाचे अध्यक्ष कमळाकर पाटील, सल्लागार – जे. पी. म्हात्रे, नारायणशेठ भोईर, चंद्रकांत घरत, पंडीत घरत, मालती भोईर, जगजीवन भोईर, महेंद्र म्हात्रे, शेखर पडते, भारत भोईर, देवराम घरत, भगवान घरत,गणेश म्हात्रे,के एम घरत, एल जी म्हात्रे, शैलेश भोईर, गणेश घरत, दीपक भोईर, दिनेश घरत,तंटामुक्ती अध्यक्ष हेमंत म्हात्रे, पी डी घरत,सरपंच सोनल घरत, उपसरपंच कुंदन भोईर, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,ग्रामसुधारणा मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.