क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या संकेतस्थळाचे अनावरण

Share Now

1,165 Views

कर्जत (जयेश जाधव) स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन या सामाजिक पत्रकार संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळाचे अनावरण नेरळ पोलीस ठाण्यात नुकतेच संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शितल अविनाश पाटील या होत्या तर या कार्यक्रमाला मंडळ अधिकारी, डॉक्टर, वकील, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन ही सामाजिक पत्रकार संघटना दि.१४ जून २०१३ पासून अधिकृतपणे कार्यरत आहे. या संघटनेला १२ ए व ८० जी हे शासनाचे प्रमाणपत्र मिळालेले आहे. त्यामुळे करदात्यांना ८० जी अंतर्गत देणगीत ५० टक्के सवलत मिळते. या संघटने मार्फत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व इतर कार्य राबविण्यात येते. या संघटनेचे मुखपत्र ‘क्राईम बॉर्डर’ हे असून ते पत्र सन २०१० पासून अव्याहतपणे प्रकाशित होत आहे. या वृत्तपत्राचे व पत्रकार संघटनेचे प्रेरणास्थान एडिशनल एस.पी.(एसीबी) डी.डी.गवारे (से.नि.) हे आहेत. एडिशनल एस.पी.डी.डी.गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस अधिकारी अविनाश पाटील व शितल अविनाश पाटील यांच्या शुभहस्ते पत्रकार संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर सन २०१० मध्ये पोलीस खात्यात रुजू झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल एस.एस.पालांडे यांची पदोन्नती पोलीस नाईक पदावर झाली असल्याने त्यांना सन्मानाने अविनाश पाटील यांच्या हस्ते बॅच प्रदान करण्यात आले.

लोकार्पण कार्यक्रमानंतर नैसर्गिक आपत्तीत (अतिवृष्टीत) सापडलेल्या येथील नागरिकांना सुरक्षितपणे जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले अशा या सर्व पोलीस बांधवांना
संघटनेच्या व क्राईम बॉर्डरच्या महिला भगिनींनी राख्या बांधून त्यांच्या भविष्यासाठी देवाकडे निरोगी आयुष्य मागितले. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी पोलिस ठाण्यातील पोलिस बंधू-भगिनी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस अधिकारी अविनाश पाटील हे यापूर्वी ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा पोलीस स्टेशन व कुळगाव पोलीस स्टेशन ग्रामीण त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण या ठिकाणी कार्यरत होते त्यांनी परिसरामध्ये अनेक समाजपयोगी कार्य हाती घेऊन ते तडीस नेले आहे. समाजात त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचे कार्य केले आहे व ते करीत आहेत. त्यांची जनमानसात एक चांगली आदर्श पोलीस अधिकारी अशी ओळख अल्पावधीतच निर्माण झाली आहे. अशा या समाजप्रिय तसेच जशास तसे उत्तर देणारे, गरिबांना न्याय मिळवून देणारे, अविनाश पाटील व शितल पाटील यांच्या शुभहस्ते सी.आर.डब्ल्यू.ए.च्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. पोलिस अधिकारी अविनाश पाटील यांनी संस्थेस व क्राईम वृत्तपत्रास भरभरून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.स्वामी सखा मासिकाच्या संपादिका तसेच क्राईम बॉर्डरच्या वृत्त संपादिका सीमा वखरे तसेच युवा पत्रकार सिकंदर शेख रवी टेकाळे सत्यम वखरे, शिवम वखरे व पोलीस बंधूंनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वखरे यांनी केले. तर आभार सीमा वखरे यांनी मानले.

3 thoughts on “क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या संकेतस्थळाचे अनावरण”

  1. आदरणीय संपादक साहेब
    सलाम रायगड वृत्तवाहिनी
    आमच्याकडून खूप शुभेच्छा अभिनंदन तसेच आपण आमच्या वृत्ताची दखल घेऊन त्याला योग्य ती प्रसिद्धी दिली त्याबद्दल आम्ही आपले कायम ऋणी राहू.
    आपल्या वृत्तवाहिनीची भरभराट होवो व जनमाणसात आपली कीर्ती वाढून तसेच सर्वसामान्यांना आपल्यातून न्याय मिळो हीच प्रार्थना धन्यवाद जय हिंद !जय महाराष्ट्र!

Leave a Reply

Your email address will not be published.