२० वर्षानंतर एकत्र येऊन दहावीच्या विद्यार्थ्यांनी केला गेट-टुगेदर साजरा

Share Now

1,488 Views

रोहा ( वार्ताहर) रोहा तालुक्यातील मेहेंदळे हायस्कूल दहावी ( ब )२००२/२००३ बॅचचे विद्यार्थी मुला मुलींनी आपल्या बालपणाची आठवणींना उजाला देण्याकरिता रविवार दि. ०७ मे ला रोजी तब्बल २० वर्षानंतर पुन्हा एकत्र येत गेट-टुगेदर साजरा केला.

मेहेंदळे हायस्कूल येथे दहावी पास झाल्यानंतर तब्बल २० वर्षानंतर हे सर्व विद्यार्थिनी व विद्यार्थी पुन्हा रोहयात येऊन आपण शिकलो त्या शाळेला नतमस्तक होऊन आपल्या गुरुवर्यांनी  दिलेल्या शिक्षणाची गुरुदक्षिणा म्हणून सदिच्छा भेट देत शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर तांबडी येथे एकत्र येत केक कापून स्नेहभोजन करून गेट-टुगेदर साजरा केला. यावेळी लहानपणीच्या आठवणी ,आपण शाळेत असताना  सरांचा खाल्लेला मार, एकमेकांच्या खोड्या आणि आपण आपल्या टाईमातले खेळलेले खेळ या सर्वांचा आज लेखाजोगा २० वर्षानंतर पुन्हा मांडण्यात आला. त्यावेळी मात्र सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. आता ऊरली सुरली ती चिंता ? लहानपणीच 

आयुष्य जगत असताना शाळेचा जीवन कधी संपला हे कधीच कोणाला कळाले नाही. आता फक्त राहिल्या चार भिंती आणि घरामध्ये असलेले साहित्य. याकडे बघण्यापलीकडे आपल्या आयुष्यात काही राहिलेच नाही. आणि आता आपण जगायचे ते फक्त पुढच्या पिढीसाठी. त्यामुळे मनात नेहमीच असं वाटतं की बालपण देगा देवा.मी लहान होतो तोच बरा होतो. हे शब्द फक्त शालेय जीवनातून शिल्लक राहिले अशी बोलकी प्रतिक्रीया उपस्थित सर्वांची होती.

गेट टुगेदर कार्यक्रमात अमोल बाकाडे, विशाल शेलार, प्रथमेश खानोलकर विवेक कानाडे दत्ता ताडकर भुषण भादेकर रोहन चांदगावकर प्रितम पाचंगे मानशी फडके सविता मोरे तेजस्वी मेहता रुपाली वाघोस्कर तेजश्री वाडकर विनायक जाधव मयुर शिंदे विघ्नेश जोशी सागर हिंदळेकर अभिषेक चव्हाण पुजा शिंदे धनश्री ठाकूर अंजली कदम मुग्धा कदम राजेश खडके अमृता गुंजाळ सविता चव्हाण कल्पना सावंत निता ढाकणे साधना बडे प्रमोद पाटील विकास चौलकर संदेश दळवी सिध्देश चुटके रोशनी दळवी लिना पाटील सुरज भाटकरआदी विद्यार्थी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *