विकासाच्या नावाखाली संपूर्ण उरण तालुका गिळंकृत करून स्थानिकांना देशोधडीला लावणाऱ्या शासनाचा सारडे, पुनाडे, वशेणीच्या ग्रामस्थांनी केला निषेध

Share Now

234 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) विकासाच्या नावा खाली संपुर्ण उरण तालुका गिळंकृत करुन स्थानिकांना देशोधडीला तसेच उध्वस्त करु पाहणाऱ्या शासनाचा उरण तालुक्यातील सारडे, पुनाडे, वशेणी गावातील ग्रामस्थांनी जाहीर निषेध केला आहे. उरण तालुक्यात आजपर्यंत हजारो मोठ मोठे प्रकल्प आले आहेत. आता उर्वरित शेती शिल्लक असलेल्या पुर्व विभागातील सारडे, वशेणी व पुनाडे गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडिसी च्या नावाखाली जमिनी हडपण्याचा शासनाचा डाव आहे. मागील जानेवारी महिन्यात संबंधित प्रकल्पाच्या विरोधात पूर्व विभागातील शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या आहेत. परंतु त्या हरकतींना शासनाने केराची टोपली दाखवलेली दिसते. शिवाय प्रकल्प काय आहे. ? त्याचा शेतकऱ्यांना मोबदला काय मिळेल ? याची काहीही माहीती शेतकऱ्यांना दिलेली नाही.

तरी ही येत्या २३ मे २०२३ रोजी सारडे गावातील प्रकल्पासाठी बाधित जमिनींची मोजणी होणार आहे. तशी नोटीस तलाठी सजा वशेणी कार्यालयाला देण्यात आलेली आहे. सदर जमिनीच्या मोजणीस सारडे गावातील शेतकऱ्यांचा प्रखर विरोध आहे. त्या साठी ए. सी. झेड. सारखा लढा उभारला तरी शेतकरी तयार आहेत. अशी माहिती गावातील ग्रामस्थ तथा माजी उपसरपंच श्यामकांत पाटील यांनी दिली. हा शासनाचा एमआयडीसी प्रकल्प हाणून पाडण्यासाठी सर्वांकडुन सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन शासनाच्या एम आय डी सी प्रकल्पला विरोध करणे गरजेचे आहे असे मत श्यामकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. २२ मे २०२३ रोजी पुनाडे गाव, २३ मे रोजी सारडे तर २४ तारखेला वशेणी गावच्या जमिनीची शासनाकडून मोजणी होणार आहे. त्यामुळे जमीन मोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे प्रशासनाने येथील शेतकऱ्यांना विश्वासात घेउन पुढील निर्णय घेणे अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *