खा. सुनील तटकरे यांच्या माध्यमातून ६५ लाखाच्या भरघोस निधीतून मोहल्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन

Share Now

105 Views

धावीर रोड (अंजूम शेटे) खा. सुनील तटकरे यांच्या माध्यमातून ६५ लाखाच्या भरघोस निधीतून रोहा वरचा मोहल्ला कब्रस्तान संरक्षण भिंत, खालचा मोहल्ला कब्रस्तान संरक्षण भिंत, रेवा ज्यूनियर सायन्स कॉलेज वाढीव इमारतीचे बांधकाम आदी मोहल्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन खा. सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी खा. सुनिल तटकरे म्हणाले की, रोहा गावातील तमाम मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणाने शैक्षणिक संस्था स्थापित करुन वेगवेगळ्या ठिकाणी विद्यालय सुरू केली. त्यावेळच्या बुजरूगांनी पुढाकार घेत रोहा एज्युकेशन अँड वेल्फेअर असोसिएशनची स्थापना केली आणि त्या माध्यमातून शिक्षणाचा दालने या सगळ्या परिसरामध्ये उपलब्ध करण्याचा प्रयत्न हा नक्कीच कौतुकास्पद आहे. खा. तटकरे पुढे म्हणाले की, गेल्या पंचवीस वर्षात माझ्या राजकीय वाटचालीमध्ये सर्वांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणावर राहिला आणि त्यावेळेला त्या त्या ठिकाणच्या शिक्षणाची दालने उत्तम पद्धतीची तयार व्हावीत. यासाठी प्रामाणिकपणाची भूमिका नेहमीच राहिली. मूळात हा सर्व कॅम्प हा एज्युकेशन कॅम्प होवो. येथे फक्त शिक्षण आणि शिक्षण, दर्जेदार पद्धतीचे शिक्षण देणे, उत्तम विद्यार्थी घडविणे, त्यांच्या भावी आयुष्याची वाटचाल करताना  सज्ञान व उत्तम पद्धतीचा विचार करून काळाची गरज ओळखून त्या ठिकाणी पावलं उचळली गेली, आशा वेळेला या उच्च माध्यमिक कॉलेजच्या निर्मिती आणि मान्यता मिळवून देण्यासाठी नक्की प्रयत्न करणार, अल्ला के घर मे देर है. मगर अंधेर नही असे खा. तटकरे  यांनी सागितले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, शहर अध्यक्ष अमित उकडे, मुस्लिम समाज वरचा मोहल्ला कमिटीचे अध्यक्ष मुजीब आलेकर, उपाध्यक्ष यजाज वासकर, खालचा मोहल्ला कमिटीचे अध्यक्ष हाफिज किरकिरे, उपाध्यक्ष सुलतान पानसरे, आलखैरीया कमिटीचे अध्यक्ष शफी पानसरे, रेवा स्कूल अध्यक्ष रियाज शेटे, अंजुमन स्कूल चेअरमन कादिर रोगे, जाफरभाई येरुणकर, मा. गटनेते महेंद्र गुजर, मा. उपनगराध्यक्ष मयूर दिवेकर, महेश कोलाटकर, जुबेर चोगले, डॉ. फरीद चिमावकर, मा. ज्येष्ठ नगरसेवक अहमदशेठ दर्जी, मा. नगरसेवक राजेंद्र जैन, समीर सकपाळ, अखलाक नाडकर, उस्मान रोहेकर, अलीम मुमेरे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *