केळघर मार्गे मुरूड एसटी बस सेवा सुरु करण्याची शिवसेनेची मागणी, रोहा आगार व्यवस्थापकांना दिले निवेदन

Share Now

378 Views

रोहा (अंजूम शेटे) रोहा तालुक्यातील घोसाळे विभागातील कांटी बोडण व आजुबाजुच्या गावातील एकुण लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक व्यक्ती कामानिमीत्त मुंबईमध्ये ये-जा करीत असतात. त्यामुळे त्यांना सायंकाळी ४ वाजता सुटणारी रोहा दिवा पॅसेंजर रेल्वेने जाणेसाठी रोहा मध्ये येण्यासाठी कोणतीही बसची सुविधा नाही, यासाठी केळघर मार्गे मुरूड- मुरूड केळघर मार्गे रोहा बस सेवा लवकरात लवकर सुरु करावी, यासाठी बुधवार दि. १७ मे रोजी रोहा शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगार व्यवस्थापक मुल्ला यांच्याकडे चर्चा करुन लेखी पत्रकाव्दारे मागणी करण्यात आली आहे.

सदर निवेदनात कांटी बोडण व आजुबाजुच्या गावातील एकुण लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक व्यक्ती कामानिमीत्त मुंबई मध्ये ये-जा करीत असतात. दिवा रोहा पॅसेंजर ने रोहा मध्ये येणा-या प्रवाशांना त्यांच्या गावी जाण्यासाठी व लेखनिक कार्यालय, दुपारी रोहा पॅसेंजरने वेळेत मुंबईकडे प्रवास कण्यासाठी या मार्गावर बस सेवा अत्यंत गरजेचे आहे. या मार्गावर बस सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असुन नाईलाजास्तव त्यांना खाजगी वाहनांनी जास्त पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. याकरीता रोहा बस स्थानकातून सकाळी ११.३० वाजता रोहा केळघर मार्गे मुरूड व पुन्हा मुरूड आगारातुन दुपारी १.३० वाजता सुटुन रोहा आगारापर्यंत बस सेवा सुरू करावी अशी मागणी शिवसेना रोहा तालुका प्रमुख ॲड मनोजकुमार शिंदे यांनी  लेखीपत्राद्वारे रोहा आगार व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे. तसेच रा.प. पेण विभाग नियंत्रक यांनाही पत्र पाठवले आहे. यावेळी तालुकाप्रमुख ॲड. मनोज कुमार शिंदे, उपतालुका प्रमुख संदेश मोरे, शहर प्रमुख मंगेश रावकर, नयन जोशी, सिद्धांत भुतकर, प्रमोद शिंदे, आशिष स्वामी, आकाश किर व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *