रोहा महसूल विभागाची अवैध माती वाहतुकीवर कारवाई, मध्यरात्री सापळा रचत लाल मातीचे तीन डंपर पकडले,माफियांत खळबळ

Share Now

164 Views

रोहा- (महेंद्र मोरे ) रोहा तहसीलदार पदाचा कार्यभार किशोर देशमुख यांनी स्विकारताच अवैध व बेफाम गौणखनीज उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येताना दिसत आहे. शुक्रवार १९ मे च्या पहाटे कोलाड येथील रेल्वे फाटक जवळ मिळालेल्या गुप्त माहितिच्या आधारावर तहसिलदारांचे आदेशानुसार सापळा रचत मंडळ अधिकारी भारत गुंड,तलाठी श्रीनिवास पवार, नंदु हिंदुळे यांनी लाल मातीने भरलेले तीन ढंपर पकडण्यात यश मिळविले.या कारवाई मुळे तालुक्यातील माती माफियांचे मध्ये खळबळ माजली असून पर्यावरण प्रेमी नागरिकांचे मधून याचे स्वागत करत महसूल प्रशासनाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

रोहा तालुक्यात होणारे विविध शासकीय प्रकल्प व खाजगी कामांसाठी लागणाऱ्या भरावासाठी मोठ्याप्रमाणावर माती उत्खनन करण्यात येते.कोलाड जवळील पहुर या भागात शासनाच्या परवानगी शिवाय लाल माती उत्खनन होत त्याची रात्रीच्या वेळी वाहतूक होत असल्याची माहिती महसूल प्रशासनास लागली. त्यानुसार रात्रीच्या वेळी कोलाड भिरा मार्गावर पाळत ठेवत एमएच ०६ बीड्ब्ल्यू ६०१७,एमएच ०६ बीड्ब्ल्यू ९०३२,एमएच ०६ बीड्ब्ल्यू ७६०१ नंबरचे लाल मातीने भरलेले तीन ढंपर पकडण्यात महसूल विभागाला यश मिळाले. या सर्व पकडलेल्या मालाला शासकीय नियमाप्रमाणे प्रत्येकी दोन लाख तीस हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.अशी माहिती रोहा तहसीलदार यांनी देत याची पुढील सविस्तर चौकशी करत यामध्ये जे दोषी आढळतील त्यांचेवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *