उरण आगारातील एस. टी. वाहक अर्जुन खांडेकर यांचा प्रामाणिकपणा, बसमध्ये सापडलेला आठ तोळ्याचा सोन्याचा हार केला परत

Share Now

64 Views

उरण (विठ्ठल ममताबादे ) दिनांक २२ मे २०२३ रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास पनवेल कडून उरणला येणाऱ्या महामंडळाच्या एस.टी. बस मध्ये आठ तोळ्याचा सोन्याचा हार हे एस.टी.चे वाहक अर्जुन खांडेकर यांना सापडला. सदरचा हार त्या बसचे वाहक अर्जुन खांडेकर यांनी प्रमाणिक पणा दाखवीत तो हार हाराचे मालक कुसुम म्हात्रे यांना परत केला. अर्जुन खांडेकर यांच्या प्रामाणिक पणाचे आगारांतील कर्मचाऱ्यांसह सर्व प्रवासी वर्गातून कौतुक करण्यात येत आहे.

पनवेल, उरण या मर्गावर उरण आगारांतून एसटी महामंडळाच्या बसेस मोठया प्रमाणात धावत असतात. या मधून अनेक प्रवासी प्रवास करतात त्याच प्रमाणे कुसुम म्हात्रे या मंगळवारी सकाळी १०:३० वाजता पनवेल ते उरण या बस मधून प्रवास करीत असता नजरचुकीने त्यांच्या जवळील सुमारे त्यांचा ८ तोळ्याचा हार न कळत बसमध्ये पडला होता. हा हार या बसचे वाहक अर्जुन खांडेकर यांच्या नजरेस पडला त्यांनी तो हार सांभाळून ठेवला.बस उरण आगारात आल्यावर त्या हाराची चौकशी करीत कुसुम म्हात्रे या वाहक अर्जुन खांडेकर यांच्या कडे परत आल्या असता त्या हारा बाबत व्यवस्थित चौकशी करून सदरचा हार त्यांनी कुसुम म्हात्रे यांना परत केला. त्यामुळे उरण आगारांतील वाहक अर्जुन खांडेकर यांच्या प्रमाणिक पणाचे आगारांतील कर्मचाऱ्यांसह सर्व प्रवासी वर्गातून कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *