आंतराष्ट्रीय अॅबॅकस स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते सत्कार

Share Now

633 Views

रोहा (उद्धव आव्हाड) नुकत्याच चिन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अॅबॅकस स्पर्धेत 19 देशांनी सहभाग घेतला. यावेळी महाड पोलादपूर येथील दिशा प्रतिष्ठानच्या पाच विद्यार्थ्यांनी चीन येथे घवघवीत यश संपादन करत रायगड जिल्ह्याचे नाव आंतराष्ट्रीय पातळीवर गाजवून भारताचा झेंडा रोवला आहे. अत्यंत लहान वयात या विद्यार्थ्यांनी भारताचा झेंडा चीनमध्ये रोवला आहे त्यामुळे सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आंतराष्ट्रीय पातळीवर यश प्राप्त केलेल्या या विद्यार्थ्यांचा पोलादपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या तसेच राष्ट्रवादी महिला उपजिल्हा अध्यक्षा प्रतिमाताई अभंग जाधव यांच्या पुढाकाराने रायगडाचे खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व या विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच चिनमध्ये महाड पोलादपूरच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीची प्रतिमा ताई यांच्या पुढाकाराने दखल घेत सन्मान सोहळ्याचे आयोजन यावेळी केल्याबद्दल खा. सुनील तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे व पालक वर्गातर्फे कौतुक करण्यात आले.

यावेळी रायगडचे खा. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्काराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राजिप अध्यक्षा आदिती तटकरे, राष्ट्रवादी प्रदेश महिला सरचिटणीस अपेक्षा कारेकर, ज्येष्ठ नेते चंद्रकांत जाधव,माजी सभापती अमोल कारेकर, जिल्हा संघटक प्रवीणाताई सावंत,महिला कार्यकर्त्या जान्हवी विचारे,युवा नेते अभंग जाधव,दिशा प्रतिष्ठानच्या भारती वडालकर आदी पालकवर्ग उपस्थित होते. उपजिल्हा अध्यक्षा प्रतिमाताई यांनी या मुलांचा खा. तटकरे यांच्या हस्ते सत्कार घडवला व मुलांना नवीन प्रेरणा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी संपूर्ण दिशा प्रतिष्ठान च्या वतीने व पालकांच्या वतीने प्रतिमाताईचे आभार मानण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *