मराठा आरक्षण उपोषणाची सांगता, आरक्षण मिळेपर्यंत लढा, मराठ्यांचा निर्धार, आरक्षणासाठी प्राण गेले तरी बेहत्तर, पुन्हा अन्नत्याग करेन ; मराठा योद्धा राजेश काफरे

Share Now

90 Views

रोहा (प्रतिनिधी) आरक्षण मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रोहयात सुरु करण्यात आलेल्या साखळी उपोषणाची सांगता आज शुक्रवारी सकाळी झाली, तीन दिवस अन्नत्याग करणारे मराठा योद्धा राजेश काफरे आणि महेश शिंदे यांना नारळ पाणी पाजून त्यांच्या आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील ज्या ज्यावेळी आमरण उपोषणाला बसतील त्यावेळी पुन्हा आपण अन्नत्याग करून उपोषण करू, आरक्षण आणि समाजाच्या हितासाठी आपला प्राण गेला तरी बेहत्तर असे मराठा समाजाचे योद्धा राजेश काफरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

उपोषणाच्या चौथ्या दिवशी सकाळी आपले अमरण उपोषण स्थगित केल्यानंतर मराठा योद्धा राजेश काफरे यांनी समाजाला संबोधित केले, आज मराठा आरक्षणासाठी मराठा समाज बांधव एकवटले आहेत. हे दृष्य बघून खऱ्या अर्थाने समाधान वाटत आहे. समाजात एकोपा टिकून ठेवण्यासाठी अशाच पद्धतीने संघटीत होऊन संघर्ष करू या, एकीच्या माध्यमातून आपण समाजाला न्याय मिळवून देऊ शकतो. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आपले आदर्श आहेत. शासनाने दिलेल्या मुदती नंतर मराठ्यांना आरक्षण मिळाला नाही तर मनोज जरांगे पाटील ज्या ज्यावेळी आमरण उपोषणाला बसतील मी देखील या अनुषंगाने पुन्हा एकदा त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून अन्नत्याग करून उपोषणाला बसणार. आरक्षण आणि समाज हितासाठी आपला प्राण गेला तरी बेहत्तर असे सांगत मराठा समाजाचे योद्धा राजेश काफरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

समारोप कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठा आरक्षण करिता काही ठीक ठिकाणी ज्या समाज बांधवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आरक्षणासाठी मराठा आता पेटून उठला आहे. विविध ठिकाणी मोर्चे, आंदोलने व उपोषण होत असल्याने शासनाच्या मनात धडकी भरली आहे. सरकारच्या विनंतीला मान देऊन मनोज जरांगे पाटील यांनी मुदत दिली आहे. मुदतीत आरक्षणाचा मुद्दा निकाली नाही लागला तर तर आपण आपला लढा अशाच पद्धतीने सुरु ठेऊ असा इशारा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी दिला. जेष्ठ नेते व्ही. टी. देशमुख यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणसाठी एक चळवळ उभी केली आहे. दोन महिन्यात सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आम्ही आत्महत्या करणार नाही तर मारून मरू असा थेट इशारा देत बांधवांना आत्महत्या न करण्याचा सल्ला दिला.यावेळी मराठा योद्धा राजेश काफरे, महेश शिंदे, नितीन परब, महेश सरदार, विजय मोरे, विनोद पाशीलकर, समीर शेडगे, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, राजेंद्र जाधव, सूर्यकांत मोरे, रोहिदास पाशीलकर, अमित उकडे, अमोल देशमुख, प्रशांत देशमुख, संदीप सावंत, सुहास येरुणकर, परशुराम चव्हाण, किशोर तावडे, शशिकांत मोरे, निलेश शिर्के, अजित मोरे, अंनत देशमुख, वैभव शेलार, किरण मोरे, विनोद सावंत आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *