प्रकल्पातील विद्यार्थी खेलो इंडिया स्पर्धेत खेळणे कौतुकास्पद : शशिकला अहिरराव, प्रकल्प अधिकारी, सानेगाव आदिवासी विकास विभाग प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धाना सुरुवात

Share Now

228 Views

रोहा : (रविंद्र कान्हेकर) आदिवासी विकास विभाग अंतर्गत होणाऱ्या क्रीडा स्पर्धामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा मिळते. गतवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये पेण प्रकल्पाने ठाणे विभागाचे नेतृत्व करत असताना विद्यार्थ्यांनी कबड्डी व मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले होते. पेण प्रकल्पातील भालिवडी आश्रम शाळेची रोहिणी भुजाडा हिने खेलो इंडिया मैदानी स्पर्धेत सहभाग घेतला ही पेण प्रकल्पातील सर्वांसाठी मोठी कौतुकाची बाब आहे. असे विधान पेण प्रकल्पातील प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी केले. सोमवारी 6 नोव्हेंबर रोजी प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धाना शासकीय आश्रम शाळा सानेगाव येथे सुरुवात झाली यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सतीश शेरमकर, सानेगाव आश्रमशाळा मुख्याध्यापक मधुकर फसाळे, माजी विद्यार्थी रोहिणी भुजाडा, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रदीप सोलसकर, लेखाधिकारी पवार सर, विस्तार अधिकारी ज्योती वाघ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोतीराम लेंडी, मुख्याध्यापक मागाडे सर, वाकडी शाळा मुख्याध्यापिका पाटील मॅडम, मुख्याध्यापक नाईक सर, कोळघर मुख्याध्यापक उत्तम पाटील, आश्रम शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापुढे बोलताना प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव म्हणाल्या कि, यावर्षी प्रकल्पाने केंद्र स्तरावर सुरुवातीला स्पर्धा घेतल्याने आता जे खेळाडू आहेत त्यांचे ते चांगला खेळ करतील. राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेत ओरिसा भुवनेश्वर येथे प्रकल्पातील भालिवडी आश्रम शाळेची विद्यार्थीनी रोहिणी भुजाडा हिने रनिंग स्पर्धेत भाग घेतला. रोहिणीला आज यासाठी आमंत्रित केले त्याचे कारण म्हणजे तिचा आदर्श आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.

प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धाकरीता सानेगाव, पिंगलस सावरई व वाकडी केंद्रातील आठशे विद्यार्थी या प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यांच्या जेवणाची व राहण्याची व आरोग्याची व्यवस्था सानेगाव आश्रम शाळेतील मुख्याध्यापक मधुकर फसाळे यांनी केली आहे. दोन दिवसीय होणाऱ्या प्रकल्प स्तर क्रीडा स्पर्धाचे उदघाटन झाले आहे असे प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी जाहीर केले आणि सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मिलिंद पाटील सरांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *