नागोठणे (याकुब सय्यद) सविस्तर वृत्त असे की अल्पसंख्याक समाजा करिता महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ पंचक्की औरंगाबाद या ठिकाणी कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्या अल्पसंख्याक समाजातील लोकांना औरंगाबाद हा अंतर फार दूरचे ठरत असल्याने वक्फ मंडळ कार्यालय औरंगाबाद येथे वक्फ संस्थेच्या कामानिमित्त जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती वेळो वेळी चकरा मारावे लागत असत अशा परस्थीतीतुन जात असताना आर्थीक परस्थीतीचा विचार केल्यास नेहमी कामासाठी जाण्यास भुईदंड न पडवणारा औरंगाबाद प्रवास असे आहे या सर्व त्रासदायक बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार वक्फ मंडळाच्या सदस्यांनी केल्याने मागील डिसेंबर महिन्यात सन २०१९ रोजी प्रस्ताव शासनाकडे मांडला होता व तो प्रस्ताव त्यावेळी पारित करून घेण्यात आला होता अल्पसंख्याक समाजाला योग्य व सोयीचे मार्ग काढण्याचा प्रस्ताव मुंबई येथील बैठकीत वक्फ बोर्डाच्या सदस्यांनी दिनांक ११ ते १२ डिसेंबर २०१९ रोजी च्या बैठकीत महाराष्ट्र राज्य व मंडळ विभागीय कार्यालय मुंबई या ठिकाणी आणण्यासाठी मागणी केली होती.
वक्फ मंडळाच्या सदस्यांच्या मागणीला अखेर यश आले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते दिनांक ०८/११/२०२३ रोजी सकाळी ठीक साडेअकरा वक्फ मंडळ विभागीय कार्यालय मुबंई येथे उदघाटन करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड सदस्यांच्या मागणीला अखेर यश आल्याने मुंबई ठाणे पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर सारख्या जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील लोकांना मशीद व दर्गाचे ट्रस्टी किंवा मालमत्ता प्रकरणा संदर्भात औरंगाबाद येथे न जाता थेट मुंबई वक्फ मंडळ विभागीय कार्यालय सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाजातील लोकांमध्ये आनंद व समाधान व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नरिमन पॉईंट मुंबई येथे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस अल्पसंख्याक समाज मंत्री माननीय अब्दुल सत्तार वक्फ मंडळाचे अध्यक्ष व विधान परिषदेचे सदस्य माननीय डॉक्टर वजाहत मिर्झा साहेब वक्फ मंडळाचे सदस्य व संसद सदस्य मा. इम्तीयाज जलील साहेब तसेच वक्त मंडळाचे सदस्य व खासदार माननीय डॉक्टर फौजिया खान साहेब वक्फ मंडळाचे सदस्य व विधानसभा सदस्य माननीय श्री फारुख शहा साहेब महाराष्ट्र राज्याचे वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय एम. बी. ताशिलदार साहेब वक्फ मंडळाचे सदस्य माननीय श्री मुद्दसर लांबे साहेब माननीय मौलाना हैदर अली साहेब माननीय समीर काझी साहेब माननीय हसनैन शाकीर साहेब उपस्थित होते.