सिलेंडरच्या स्फोटात तीन जण जखमी, भुवनेश्वर येथील घटना

Share Now

541 Views

रोहा (प्रतिनिधी) वरसे ग्रामपंचायत हद्दीतील कालवा रस्ता भुवनेश्वर येथील रहिवासी मनोहर अंबाजी घोसाळकर यांच्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली. सिलेंडरच्या स्फोटात मनोहर घोसाळकर यांसह अन्य दोघेजण जखमी झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सिलेंडर स्फोटाची माहिती समजताच अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यातील जखमींना अधिक उपचारार्थ मुंबईला हलविण्यात आल्याची माहिती रोहा पोलिसांनी दिली.

भुवनेश्वर कालवा रस्ता येथील रहिवासी मनोहर घोसाळकर यांच्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याचे समोर आले. सिलेंडरच्या स्फोटाच्या दुर्घटनेत मनोहर घोसाळकर, सायली घोसाळकर, भावना घोसाळकर गंभीर जखमी झाले, घर, घरातील साहित्याचीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. स्फोटानंतर शेजारी व नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला, हे प्रथमदर्शी समोर आले. घटनेचा अधिक तपास रोहा पोलीस करत आहेत. दरम्यान, ऐन दिवाळी सणात दुर्दैवी घटना घडल्याने घोसाळकर कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले आहे, तर दानशूर लोकांनी घोसाळकर कुटुंबाला सहकार्य करावे असे आवाहन परीट समाजाचे रायगड जिल्हा युवा अध्यक्ष रविंद्र कान्हेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *