उरण ( विठ्ठल ममताबादे ) जनसेवेतून आनंद देणा-या वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने शाळकरी मुलांच्या कलेला वाव देणे आणि दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी वशेणी आणि पुनाडे गाव मर्यादीत किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतला उदंड प्रतिसाद मिळाला असून ५२ जणांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व किल्ले हे मुलांनी माती पासून तयार केले होते. एक देखील बाजारात मिळणारा किल्ला नव्हता. या किल्ले बांधणी स्पर्धेचे बक्षीस वितरण बाल दिनाचे औचित्य साधून श्री हनुमान मंदिर वशेणी येथे करण्यात आले. या किल्ले बांधणी स्पर्धेचे परीक्षण मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्रनाथ म्हात्रे, संदेश गावंड आणि प्रविण ठाकूर यांनी केले होते.
प्रथम क्रमांक- स्वरा संदेश म्हात्रे ( प्रतापगड),
व्दितीय क्रमांक- साई समाधान म्हात्रे (लोहगड),
तृतीय क्रमांक- अर्पित प्रविण पाटील (मुरूड- जंजिरा),
उत्तेजनार्थ- दक्ष प्रेमनाथ पाटील (मुरूड जंजिरा),
उत्तेजनार्थ- वेदांत प्रविण ठाकूर (पुरंदर),
लक्षवेधी – पूर्वा प्रताप पाटील (कर्नाळा) ,
लक्षवेधी- आर्या कृष्णा पाटील (पन्हाळा),
लक्षवेदी- चित्रलेखा प्रदिप पाटील (तोरणा),
लक्षवेधी- रूपेश रोशन पाटील (प्रतापगड),
विशेष सजावट – निशा निलेश पाटील या सर्व सहभागी स्पर्धकांना मंडळाकडून भेटवस्तू देण्यात आले. सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सुरेंद्र म्हात्रे, किशोर म्हात्रे, डाॅक्टर रविंद्र गावंड, संदेश गावंड, आदिनाथ पाटील यांचे विशेष योगदान मिळाले.सदर बक्षीस वितरण कार्यक्रमास गणेश खोत, बळीराम म्हात्रे, पंढरीनाथ पाटील, महेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनिल ठाकूर, अनंत पाटील, निसर्ग म्हात्रे ,जगन्नाथ म्हात्रे, अनंत तांडेल, राम तांडेल, पुरूषोत्तम पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. एकंदरीत गड किल्ले बांधणी स्पर्धेला जनतेचा, विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.