रोहा: सिलेंडर स्फोट घटनेतील जखमी तरुणीचा करूण अंत, सबंध रोहा हळहळला ! सिलेंडर नीट हाताळा, बॉम्ब बनू देऊ नका

Share Now

1,082 Views

रोहा (प्रतिनिधी) वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर येथे राहणारे मनोहर घोसाळकर यांच्या घरी सोमवारी सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. त्या अनपेक्षीत स्फोटात कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यातील जखमी भावना घोसाळकर वय २२ हया तरुणीचा मुंबई हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान करूण अंत झाल्याचे समोर आले. खूपच वेदनादायी घटना घडली. घरातील तरुणीला सिलेंडर स्फोटात जीव गमवावा लागल्याने वरसे यांसह सबंध रोहा चांगलाच हादरून गेला. माणुसकी अक्षरश: हळहळली. दरम्यान, सिलेंडर नीट हाताळा, सिलेंडर चालू असताना मोबाईल जवळ वापरू नका, दारे खिडक्या उघडी ठेवा, सिलेंडरची जागा सुरक्षीत ठेवत सिलेंडरला बॉम्ब बनू देऊ नका असा सल्ला घटनेनंतर तज्ञांनी दिला तर सिलेंडर कंपनीकडून विमा व शासकीय मदत बाधीत कुटुंबाला मिळावी, जखमी असणाऱ्यांना लोकप्रतिनिधी व दानशूरांनी मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

भुवनेश्वर कालवा रस्ता येथील रहिवासी मनोहर अंबाजी घोसाळकर यांच्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. त्या स्फोटातील दुर्घटनेत मनोहर घोसाळकर, सायली घोसाळकर, भावना घोसाळकर गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारार्थ मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. घर, घरातील साहित्य याचे अतोनात नुकसान झाले. स्फोटानंतर शेजारी व नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला, हे वास्तव असतानाच आगीतील जखमी भावना घोसाळकर हिचा शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी आली आणि वरसे यांसह सबंध रोहा खूप पाणावला. भावना घोसाळकर हिच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचाराला प्रतिसाद देणे थांबल्याने अखेर भावना घोसाळकर हिची प्राणज्योत मालवली. या घटनेने रोहा चांगलाच हादरला. सिलेंडर किती धोकादायक असू शकतो हे पुन्हा समोर आले. त्यामुळे सिलेंडर नीट हाताळला गेला पाहिजे. अतिरिक्त सिलेंडर अडगळीत ठेवला जाऊ नये, त्याची जागा मोकळी व सुरक्षीत असली पाहिजे, हेच या दुर्दैवी घटनेने नव्याने दाखवून दिले. दरम्यान, काबाडकष्ट करून उदारनिर्वाह करणाऱ्या सर्वपरिचित घोसाळकर कुटुंबाची सिलेंडर स्फोटात अपरिमीत हानी झाल्याने अनेकांची संवेदना प्रकट केली तर घोसाळकर कुटुंबाला आता आधार देण्याची गरज व्यक्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *