खारगांव, येरळ, खांबेरे ग्रा.पंत उपसरपंच निवड राजकीय नाट्याने चर्चेत, ३ तास ठाण मांडूनही आमदारांच्या पदरी ‘निराशा’ अपेक्षेप्रमाणे विरजोली पूर्णत: राष्ट्रवादी..!

Share Now

358 Views

रोहा (प्रतिनिधी) तालुक्यातील निवडणुका झालेल्या १२ ग्रा.पं.तीच्या उपसरपंच पदाची निवड शुक्रवारी पार पडली. त्यात खांबेरे ग्रा.पं.त राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गटासाठी उपसरपंच निवड प्रचंड वादादीत ठरली. निवडणूक आघाडी म्हणून लढविली. त्यात उपसरपंच पद शिंदे गटाला देण्याचे ठरले होते. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीने सदस्य पळवापळवी करून शिंदे गटाला ठेंगा दाखवला. त्यावर शिंदे गटाचे तालुकाप्रमुख ॲड मनोजकुमार शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी विश्वासघातकी आहे, यापुढे राष्ट्रवादीशी युती नाही, असा राग व्यक्त केला. राष्ट्रवादीचे दत्तात्रेय जंगम उपसरपंच झाल्याने खांबेरे ग्रा.पं.तीवर राष्ट्रवादीचे पूर्णतः वर्चस्व राहीले. दुसरीकडे तटकरेंचा मतदान असणाऱ्या येरळ ग्रा.पं.मधील वॉर्डात भाजपाचे दोन्हीही उमेदवार निवडून आले, त्यामुळे आधीच टेन्शनमध्ये आलेल्या तटकरेंनी उपसरपंच निवडीवेळी अधिक सावधानता बाळगली. मंत्री आदिती तटकरे यांच्यावर विरोधकांचे मनोधैर्य बंदोबस्त करून उपसरपंच पद मिळविण्याची नामुष्की आली, उपसरपंच पदाच्या निवडीवेळी स्वतः मंत्री हजर राहिल्या, दबाव गट निर्माण केला, हे समोर आल्याने तुफान चर्चा सुरू झाली. विकास आघाडी म्हणून लढलेली विरजोली ग्रा.पं.चायत सर्व सदस्यांनी अखेर राष्ट्रवादीचे अपेक्षेप्रमाणे मांडलिकत्व पत्करले. याच सर्व घडामोडीत ग्रामस्थांनी प्रतिष्ठेची केलेली खारगांव ग्रा.पं.यतीत जबरदस्त राजकीय नाट्य घडले. सरपंचपदी राष्ट्रवादीचे दत्तात्रेय काळे निवडून आले. उपसरपंच पदाच्या शर्यतीत राष्ट्रवादीचे सतेज आपणकर आघाडीवर होते. आपणकर उपसरपंच व्हावे यासाठी खुद्द आ अनिकेत तटकरे, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर तब्बल ३ तास ठाण मांडून होते. मात्र सदस्य सतेज आपणकर यांना सदस्यांनी धुडकावत राष्ट्रवादीचे रामदास दळवी यांना उपसरपंच करून आ तटकरेंच्या पदरी निराशा दिली, सध्या याचीच चर्चा रोहा राजकारणात सुरू आहे.

रोहा पंचायत राज उपसरपंच निवडणुकांत नाट्यमय घडामोडी घडल्या. सर्व तटकरे कुटुंबांचे मतदान असणाऱ्या येरळ ग्रा. पं.त वॉर्डात प्रथमच दोन्ही जागांवर भाजपचे राजाराम किर्जत, समृद्धी साळवी असे एकूण तीन उमेदवार निवडून आल्याने बलाढ्य तटकरेंची चांगलीच झोप उडाली. तटकरेंच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला. येरळ ग्रा.पं.यत उपसरपंच निवड भाजपाने बिनविरोध दिली नाही. मंत्री आदिती तटकरे निवडीवेळी ठाण मांडून होत्या. अखेर राष्ट्रवादीच्या कविता तटकरे उपसरपंच झाल्या. त्यासाठी खुद्द मंत्र्यांना ठाण मांडून बसावे लागले हे समोर आले. खांबेरे ग्रा.पं.यत उपसरपंच पदाचा वाद अखेर चव्हाट्यावर आला. आघाडीत शिंदे गटांनी उपसरपंच पदाची मागणी केली. मात्र ऐनवेळी सदस्य संख्या जास्त असल्याने मुरब्बी आत्माराम कासार यांनी शिंदे गटाला ठेंगा दाखवत दत्तात्रेय जंगम यांना उपसरपंच करणे भाग पाडले. त्यावर तालुकाप्रमुख मनोजकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या कुटनितीवर कडाडून टीका केली. राष्ट्रवादी विश्वासघातकी आहे, यापुढे युती नाही असा निर्धार ॲड शिंदे यांनी व्यक्त केला. दुसरीकडे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे गटाने राष्ट्रवादी विश्वासघातकी आहे असा प्रश्न खा सुनिल तटकरेंना विचारताच मनोज शिंदे व आमच्यात आता चर्चा झाली. ती टीका अवरोधाने झाली हे शिंदे यांनी मान्य केले, वाद संपला, असे स्पष्टीकरण खा तटकरेंनी केल्याने परत नव्याने चर्चा सुरू झाली. यात खारगांव उपसरपंच निवड नाट्य कमालीची चर्चेत आली. आपणकर कुटुंबाला दोनदा सरपंच पद दिले तरीही उपसरपंच पद सदस्य सतेज आपणकर मागत आहेत, ही मागणी आधीच ग्रामस्थांनी धुडकावून लावली. तरीही सतेज आपणकर उपसरपंच व्हावे यासाठी आ अनिकेत तटकरे, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर तब्बल ३ तास ठाण मांडून होते. अखेर सदस्यांनी ग्रामस्थांचा निर्धार मतदानातून व्यक्त केला. त्यात राष्ट्रवादीचे रामदास दळवी यांना ६ मते टाकून आ तटकरेंच्या महत्त्वकांक्षेवर स्वतःच्याच सदस्यांनी पाणी टाकले, त्यातून सतेज आपणकर यांना उपसरपंच पदापासून रोखले. ३ तास ठाण मांडूनही आ तटकरेंच्या पदरी निराशा पडली. याची चर्चा रोहा राजकारणात सुरू आहे. दरम्यान, पंचायत राजमध्ये तटकरेंचे वर्चस्व आहे, १२ पैकी ७ ग्रा.पं.तीवर पूर्णत: वर्चस्व मिळवूनही तटकरेंना उपसरपंच निवडणुकीत ताकही फुंकून प्यावे लागले. खारगांव, येरळ ग्रा.पं.तीत ठाण मांडावे लागले. खारगांव ग्रा.पं.तीत समोरच सदस्यांनी आपणकर यांना दूर करत दळवी यांना उपसरपंच केल्याचे पाहावे लागले. यातून निर्णय ग्रामस्थ घेऊ शकतात, तुमचा हस्तक्षेप मान्य नाही, हे निर्धाराने दाखवून दिले, अशी तुफान चर्चा नाक्यानाक्यावर सुरू आहे. यात शिंदे गटाचे सदस्य विकास पाटील यांची भूमिका निर्णायक ठरली हेही नाट्यातून अधोरेखीत झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *