रोह्यात सकल मराठा समाजाने दिला हिंदू – मुस्लिम ऐकतेचा संदेश

Share Now

34 Views

रोहा – (प्रतिनिधी) रोहा शहरात मुस्लिम समाज बांधवांकडून नुकताच दोन दिवसीय इज्तिमा संपन्न झाला. या इज्तिमा कार्यक्रमात रोहा, अलिबाग, मुरुड, तळा तालुक्यातील हजारो मुस्लिम समाज बांधवांनी आपली उपस्थिती नोंदवली. या धार्मिक मेळाव्यातून हिंदू – मुस्लिम भाईचारा आणि ऐकतेचा संदेश देण्याच्या हेतूने रोहा तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने आलेल्या भाविकांना पाण्याच्या बॉटल्स वाटप करण्यात आल्या. म्हाडा कॉलनी मैदान येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी तालुका सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप आप्पा देशमुख, नेते नितीन परब, प्रा. अतुल साळुंखे सर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव, प्रशांत देशमुख, राजेश काफरे, भारत वाकचौरे, सुहास येरुणकर, अष्टमी मुस्लिम समाज अध्यक्ष शफी पानसारे, डॉ. अजीम घरटकर, डॉ. फरिद चिमावकर, डॉ. अरबाज खान, माजी नगरसेवक अहमद दर्जी, उस्मान रोहेकर, जमीर कर्जिकर, समीर दर्जी, मुजम्मील येरुणकर, मुशीर दर्जी, मुखत्यार फौंजे, इब्राहिम मुल्ला आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *