रोहा : सिलेंडर स्फोट घटनेतील जखमी मनोहर घोसाळकर यांचीही मृत्यूशी झुंझ संपली, अख्खा कुटुंब उद्ध्वस्त, लेकी पाठोपाठ वडिलांचाही मृत्यू, सारेच धक्कादायक

Share Now

66 Views

रोहा (प्रतिनिधी) वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर कालवा रोड येथे मागील पंधरवड्यात सिलेंडर स्फोटची भयानक घटना घडली होती. रहीवासी मनोहर घोसाळकर यांच्या घरातील सिलेंडर दुर्घटनेत स्वतः यांसह दोन मुली प्रचंड भाजल्या, त्यातील करिअरचे स्वप्न बघणारी मुलगी भावना घोसाळकर हिचा शुक्रवारी १७ नोव्हेंबर रोजी उपचारार्थ मृत्यू झाला, हा धक्का असतानाच घटनेतील जखमी वडील यांचीही अखेर शुक्रवारी आठवड्यात उपचारार्थ प्राणज्योत मालवली. स्फोट दुर्घटनेत घोसाळकर कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले होते. मनोहर घोसाळकर तब्बल १३ दिवस मृत्यूशी झुंझ देत असताना अखेर त्यांचीही प्राणज्योत मालवली.

भुवनेश्वर कालवा रोड येथील सिलेंडर स्फोट घटनेतील जखमी भावना घोसाळकर वय २२ हया तरुणीचा मुंबई हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान करूण अंत झाल्याचे समोर आले. घरातील तरुणी पाठोपाठ वडिल मनोहर घोसाळकर वय ६५ यांना सिलेंडर स्फोटात जीव गमवावा लागल्याने वरसे यांसह सबंध रोहा चांगलाच हादरून गेला. तर घोसाळकर कुटुंबावर दुखाचे मोठे डोंगर कोळसले आहे. दरम्यान, मुली पाठोपाठ जखमी वडिलांचाही करुण अंत झाल्याने सर्वच भयानक वाटत आहे, घरातील सिलेंडर घोसाळकर कुटुंबासाठी अक्षरशः बॉम्ब बनला, अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झाला, हे प्रचंड धक्कादायक आहे, अशी दुःखद भावना व्यक्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *